काय असते सरोगसी प्रेग्नन्सी? ज्याद्वारे अभिनेत्री नयनतारा झाली लग्नाच्या चार महिन्यातच जुळ्या मुलांची आई
सरोगसी हे वैद्यकीय क्षेत्राने समाजाला दिलेले खूप मोठे योगदान आहे. सरोगसीच्या माध्यमातून बाळाला कसा जन्म देण्यात येतो हे जाणून घेऊया.
मुंबई, साउथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा आणि विघ्नेश शिवन (Nayantara And Vighnesh Shivan) नुकतेच सरोगसीच्या मदतीने जुळ्या मुलांचे पालक झाले आहेत. नयनतारा आणि विघ्नेश यांचा विवाह यावर्षी 9 जून 2022 रोजी झाला होता. लग्नानंतर फक्त चार महिन्यात आई झालेल्या नयनताराच्या विषयावर सोशल मीडियावर अक्षरशः पोस्ट आणि मिम्सचा पाऊस पडतोय. यानिमित्याने जाणून घेऊया सरोगसी म्हणजे नेमके काय? (what is surrogacy)
सरोगसी म्हणजे काय
सरोगसीच्या मदतीने अनेक सेलिब्रिटी पालक बनत आहेत आणि भारतातही सरोगसीचा ट्रेंड खूप वाढला आहे. ज्या महिला प्रजनन क्षमता, गर्भपात किंवा धोकादायक गर्भधारणेमुळे गर्भधारणा करू शकत नाहीत त्यांच्यासाठी सरोगसीचा पर्याय अतिशय फायदेशीर ठरतो. सरोगसी म्हणजे जेव्हा एखादे जोडपे मुलाला जन्म देण्यासाठी दुसऱ्या महिलेच्या गर्भाचा वापर करतात, तेव्हा या प्रक्रियेला सरोगसी म्हणतात. म्हणजेच सरोगसीमध्ये दुसरी स्त्री स्वत: किंवा दुसऱ्या दात्यासाठी गर्भधारणा करते. जेव्हा एखादी स्त्री स्वतःच्या किंवा डोनरच्या एग्सद्वारे दुसऱ्याचे मूल तिच्या गर्भात वाढविते तिला सरोगेट मदर म्हणतात.
सरोगसीचे किती प्रकार आहेत?
सरोगसीचे २ प्रकार आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया-
- पारंपारिक सरोगसी- या प्रकारच्या सरोगसीमध्ये वडिलांचे किंवा दात्याचे म्हणजेच डोनरचे शुक्राणू सरोगेट आईच्या अंड्यांशी जुळतात. मग डॉक्टर कृत्रिमरित्या शुक्राणू थेट सरोगेट स्त्रीच्या गर्भाशयात सोडतात. या पद्धतीने स्त्री गर्भधारण करते.
- गर्भावस्थेतील सरोगसी- या प्रकारच्या सरोगसीमध्ये सरोगेट मातेचा मुलाशी संबंध अनुवांशिकदृष्ट्या नसतो, म्हणजेच सरोगेट मातेच्या अंड्याचा वापर गर्भावस्थेत होत नाही. यामध्ये सरोगेट माता ही मुलाची जैविक आई नसते. ती फक्त मुलाला जन्म देते. वडिलांचे शुक्राणू आणि आईची अंडी किंवा डोनरचे शुक्राणू आणि अंडी यांच्यात टेस्टट्यूबमध्ये जुळल्यानंतर ते सरोगेट आईच्या गर्भाशयात प्रत्यारोपित केले जाते.
यात जोखीम किती?
गर्भावस्थेच्या सरोगसीची वैद्यकीय प्रक्रिया थोडी क्लिष्ट आहे. यामध्ये IVF पद्धतीचा अवलंब करून गर्भ तयार केला जातो आणि नंतर तो सरोगेट महिलेकडे हस्तांतरित केला जातो. जरी IVF पारंपारिक सरोगसीमध्ये देखील वापरला जाऊ शकतो, परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये केवळ कृत्रिम गर्भाधान (IUI) स्वीकारले जाते.
IUI ही खूप सोपी वैद्यकीय प्रक्रिया आहे. यामध्ये सरोगेट महिलेला सर्व प्रकारच्या चाचण्या आणि उपचार करावे लागत नाहीत. पारंपारिकपणे, सरोगेटचा वापर फक्त अंड्यासाठी केला जात असल्याने, ज्या स्त्रीला मूल होऊ इच्छित आहे, तिला अंडी काढून टाकल्यामुळे सर्व समस्यांना तोंड द्यावे लागत नाही.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही दावा करीत नाही)