प्लांट बेस्ड की व्हेगन डाएट? आरोग्यासाठी कोणते डाएट फायदेशीर, जाणून घ्या दोघांमधील फरक
निरोगी राहण्यासाठी, आजकाल बहुतांश लोक मांसाहार कमी करून प्लांट बेस्ड आणि व्हेगन डाएट निवड करत आहेत. पण यापैकी कोणता आहार चांगला याबाबत लोकांमध्ये अद्याप संभ्रम आहे.
नवी दिल्ली – गेल्या काही वर्षांमध्ये लोकांच्या खाण्यापिण्यात आणि राहणीमानात खूप बदल झाला आहे. पूर्वी, जिथे लोक प्रत्येक पार्टीत किंवा कोणत्याही सेलिब्रेशनमध्ये मांसाहार (non-veg) करण्यास प्राधान्य देत असत, पण आता बहुतांश लोक प्लांट बेस्ड (plant based diet) आणि व्हेगन डाएट (vegan diet) निवडू लागले आहेत. पण यापैकी कोणता आहार चांगला याबाबत लोकांमध्ये अद्याप संभ्रम आहे. बहुतेक लोक हे दोन्ही आहार समान आहेत, असे मानतात कारण या दोन्ही आहारांमध्ये शाकाहारी गोष्टींचा समावेश केला जातो. पण असं नाहीये, हे दोन्ही आहार वेगळे आहेत.
जरी प्लांट बेस्ड आणि व्हेगन डाएटमध्ये वनस्पतीद्वारा निर्मित पदार्थांचा वापर केला जात असला तरी असे अनेक पदार्थ आहेत, जे शाकाहारी मानले जात नाहीत, म्हणन त्यांचे प्लांट बेस्ड डाएटमध्ये सेवन केले जात नाहीत. आरोग्याच्या दृष्टिकोनातून दोन्ही प्रकारचे आहार अधिक चांगले मानले जातात. प्लांट बेस्ड आणि व्हेगन डाएटमध्ये काय फरक आहे, ते जाणून घेऊया.
व्हेगन डाएट म्हणजे काय ?
व्हेगन डाएट म्हणजे असा आहार ज्यामध्ये प्राण्यांशी संबंधित कोणतीही गोष्टीचा आहारात किंवा आपल्या जीवनात वापर केला जात नाही. व्हेगन डाएटचे पालन करणारे लोक केवळ आहारातच नव्हे तर आयुष्यातही अशा कपडे, चपला, बूट, औषधे अशा गोष्टींचा वापर करत नाहीत ज्यांचा प्राण्यांशी संबध येईल. उदाहरणार्थ, दूध, चीज, पनीर, चामडे इत्यादी.
प्लांट बेस्ड डाएट म्हणजे काय ?
प्लांट बेस्ड डाएट हा सामान्यतः निरोगी आहाराचा एक प्रकार आहे ज्यामध्ये वनस्पती-आधारित गोष्टींचा समावेश केला जातो. बरेचसे लोक त्यामध्ये प्राण्यांपासून मिळालेली किंवा तयार केलेली उत्पादनेही खाऊ शकतात. त्याच वेळी, काही लोक हे केवळ प्लांट-बेस्ड गोष्टींवरच अवलंबून असतात. अनेकजण या डाएटमध्ये तेलाचा वापरही टाळतात. चीज, हॉट डॉग, चीज स्लाइस आणि दूध यांचा प्लांट-बेस्ड डाएटमध्ये समावेश केलेला नाही.
प्लांट बेस्ड आणि व्हेगन डाएटमधील अंतर
– व्हेगन डाएटमध्ये मांस, सीफूड, अंड आणि डेअरी प्रॉडक्ट्सचा समावेश करता येतो पण प्लांट बेस्ड डाएटमध्ये केवळ वनस्पतींपासून निमिर्ती झालेल्या गोष्टींचाच समावेश केला जातो.
– नारळ, ऑलिव्ह आणि सोया तेल यांसारख्या प्लांट-बेस्ड तेलांचा या दोन्ही डाएटमध्ये समावेश केला जाऊ शकतो.
– बहुतेक व्हेगन लोक कपडे, बूट, चपला आणि अन्न यांसारख प्राण्यांपासून बनविलेले पदार्थ आणि वस्तूंचा वापर करणे टाळतात, परंतु काही लोक या गोष्टी वापरतात. प्लांट-बेस्ड डाएट फॉलो करणारे लोक देखील या गोष्टी वापरू शकतात.
– दोन्ही प्रकारच्या डाएटमध्ये फळं आणि भाज्यांचा समावेश करता येऊ शकतो.
– लोक त्यांच्या गरजेनुसार व्हेगन डाएट मोल्ड करू शकतात पण प्लांट-बेस्ड डाएटचे काटेकोरपणे पालन करावे लागते.
– जे लोक मांसाहारापासून पूर्णपणे दूर राहतात त्यांच्यासाठी व्हेगन आणि प्लांट-बेस्ड डाएट हे चांगले आहे. ही दोन्ही डाएट्स आरोग्याच्या दृष्टिकोनातून फायदेशीर मानली जातात.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)