Lactose Intolerance: काही लोकांना का पचत नाही दूध ? जाणून घ्या कारण
जर तुम्हालाही दूध प्यायल्यानंतर उलटी होणे, जुलाब किंवा पोटदुखीचा त्रास होत असेल तर याला Lactose Intolerance असे म्हटले जाते. हा त्रास कोणाला व का होतो हे जाणून घेऊया.
नवी दिल्ली – काही लोकांची इच्छा असूनही त्यांना दूध पीता येत नाही कारण त्यांना Lactose Intolerance चा त्रास असतो. याचाच अर्थ, त्यांन दूध (milk) नीट पचत नाही. दूध प्यायल्यानंतर त्यांच्या शरीरात अनेक समस्या उद्भवू लागतात. दुधामध्ये लॅक्टोज (lactose) नावाची साखर असते, जी शरीर शोषून घेते व त्याचे ग्लूकोजमध्ये रुपांतर करते व शरीराला शक्ती मिळते. या प्रकारची साखर केवळ दुधामध्येच आढळते.
का पचत नाही दूध ?
दुधामध्ये असलेल्या लॅक्टोजचे पचन करण्यासाठी, लॅक्टेज नावाचे एन्झाइम आवश्यक असते जे लहान आतड्यात तयार होते. वयाच्या 2 वर्षांपर्यंत, हे एन्झाइम भरपूर प्रमाणात तयार होते. मात्र त्यानंतर त्याच्या निर्मितीची प्रक्रिया हळूहळू कमी होत जाते. जर शरीरात हे एन्झाइम अजिबात तयार न झाल्यास दूध पचत नाही व ते मोठ्या आतड्यात जाते आणि तिथेच कुजू लागते. यामुळेच अतिसार, गॅसेस, पोट फुगणे, पोटदुखी अशा समस्यांना सामोरे जावे लागते. वैद्यकीय भाषेत याला Lactose Intolerance म्हणजेच लॅक्टोज इनटॉलरन्स म्हणतात.
दूध न पचण्याचे कारण
– लॅक्टोज इनटॉलरन्सची ही समस्या बहुतेक अनुवांशिक असते. म्हणजेच तुमच्या घरातील इतर कोणत्याही व्यक्तीला हा त्रास असेल तर तो तुम्हालाही होऊ शकतो.
– लहान आतड्यात काही दोष असेल तर लॅक्टोज तयार न झाल्यामुळे दूध पचू शकत नाही.
– काही रोग किंवा संसर्गामुळे, आतड्यांमध्ये लॅक्टोज तयार न झाल्यामुळे दूध पचत नाही.
दूध न पचण्याची लक्षणे
– दूध न पचल्यामुळे, दूध प्यायल्यानंतर काही वेळातच पोट फुगणे, पोटदुखी किंवा गोळा येणे, अस्वस्छ वाटणे, जुलाब होणे यासारखा त्रास होतो. शरीरात किती लॅक्टोज तयार होत आहे यावरही ते अवलंबून असते.
– दूध पचत नसेल तर दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन टाळावे.
(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)