Health : जास्त प्रमाणात पाणी पिणं बेतू शकतं जीवावर, नेमकं किती प्रमाणात प्यावं, जाणून घ्या
तुम्हाला माहितीये का पाणी जास्त पिणे हे देखील तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. जास्त पाणी प्यायल्यामुळे तुमचा जीव देखील जाऊ शकतो. याला वैद्यकीय भाषेमध्ये हायपोनेट्रेमिया असे म्हणतात.
![Health : जास्त प्रमाणात पाणी पिणं बेतू शकतं जीवावर, नेमकं किती प्रमाणात प्यावं, जाणून घ्या Health : जास्त प्रमाणात पाणी पिणं बेतू शकतं जीवावर, नेमकं किती प्रमाणात प्यावं, जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/09/drink-water-1.jpg?w=1280)
मुंबई : पाणी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. डॉक्टर देखील प्रत्येकाला भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. तसेच पाण्याची कमतरता असेल तर आपल्याला अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे पाणी पिणे खूप गरजेचे असते. आपल्या शरीरासाठी ऑक्सिजन जितका महत्त्वाचा असतो तितकच पाणी देखील महत्त्वाचे असते. त्यामुळे पाणी पिणे खूप गरजेचे असते.
जेव्हा आपण कमी कालावधीमध्ये जास्त पाणी पिण्यास सुरुवात करतो तेव्हा ही समस्या निर्माण होते. आपल्या किडनीमध्ये पाणी साचते आणि किडनीमध्ये जास्त पाणी साचल्यामुळे शरीरातील सोडियमचे पातळी असंतुलित होते. त्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक गंभीर आजार निर्माण होण्यास सुरुवात होते. त्यामुळे जास्त पाणी पिणे हानिकारक ठरते.
जेव्हा तुम्ही पाणी पीत असाल तेव्हा जास्तही प्रमाणात पिऊ नका. तुम्ही एकाच वेळी पाणी पिण्याऐवजी ते हळूहळू प्या. यामुळे तुमच्या आरोग्याला कसलीही हानी पोहोचणार नाही. तज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, प्रत्येकाने दिवसाला तीन लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. तसेच जर तीन लिटर पाणी पिण्यास तुमचे शरीर सक्षम नसेल तर जास्त प्रमाणात देखील ते पिऊ नका.
पाणी पिल्यामुळे आपले शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. पण आपल्या शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त झाले तर ओव्हरहायड्रेशन होते. कारण जेव्हा आपण जास्त पाणी पितो तेव्हा शरीर पाणी शोषण्यास असमर्थ असते. त्यामुळे जास्त पाणी पिलं तर तुम्हाला थकवा जाणवू शकतो. तुमच्या शरीरातील ऊर्जा कमी होऊ शकते. तसेच तुम्हाला मळमळ, उलट्या होऊ शकतात किंवा डोकेदुखीचा देखील त्रास निर्माण होऊ शकतो.
कधीही पाणी पिताना ते एकदम पिऊ नका, थोडे थोडे प्या. तसेच तुम्ही बाहेरून आल्यानंतर एकदम पाणी पिऊ नका, शांत बसा आणि त्यानंतर हळूहळू पाणी प्या. तसेच पाण्यासोबत तुम्ही फळांचे रस, नारळ पाणी देखील पिऊ शकता. तसेच तुमच्या शरीराच्या क्षमतेनुसार पाणी प्या ते तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते.