World Parkinson’s Day : जागतिक पार्किन्सन्स दिन म्हणजे काय ? जाणून घ्या एका क्लिकवर
आज जागतिक पार्किन्सन्स दिन (World Parkinson's Day) आहे. हा दिवस दरवर्षी 11 एप्रिल रोजी साजरा केला जातो. वास्तविक हा एक आजार आहे. त्यामुळे हालचालींचा वेग मंदावतो. स्नायू कडक होतात आणि शरीरात थरथरण्याची समस्या जाणवते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हा आजार अनेकदा एका हाताच्या थरथराने सुरू होतो.
मुंबई – आज जागतिक पार्किन्सन्स दिन (World Parkinson’s Day) आहे. हा दिवस दरवर्षी 11 एप्रिल रोजी साजरा केला जातो. वास्तविक हा एक आजार आहे. त्यामुळे हालचालींचा वेग मंदावतो. स्नायू कडक होतात आणि शरीरात थरथरण्याची समस्या जाणवते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हा आजार अनेकदा एका हाताच्या थरथराने सुरू होतो. जगभरात लाखो लोक या आजाराने ग्रस्त (Suffering from illness) आहेत. त्याच्या उपचारासाठी अनेक औषधे देखील उपलब्ध आहेत. ती तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने (Doctor’s advice) घेऊ शकता.
हा आजार वृद्धांना अधिक प्रभावित होतो
हा आजार स्त्री आणि पुरुष दोघांनाही होऊ शकतो.याचा परिणाम स्त्रियांपेक्षा 50 टक्के अधिक पुरुषांवर होतो. हा आजार वृद्धांना अधिक प्रभावित होतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, त्याची सुरुवात हळूहळू होते, म्हणजेच त्याची लक्षणे कधी दिसू लागली हे कळत नाही. काही आठवडे किंवा महिन्यांनंतर, जेव्हा लक्षणांची तीव्रता वाढते. तेव्हा काहीतरी चुकीचे असल्याची भावना होते.
या कारणामुळे पार्किन्सन आजार होतो
हा आजार तेव्हा होतो, जेव्हा मेंदूच्या एखाद्या भागातील चेतापेशी किंवा न्यूरॉन्स नष्ट होऊ लागतात. सामान्यतः हे न्यूरॉन्स डोपामाइन नावाचे एक महत्त्वाचे मेंदूचे रसायन तयार करतात. जेव्हा हे न्यूरॉन्स मरतात किंवा कमजोर होतात. तेव्हा ते कमी डोपामाइन तयार करतात. त्यामुळे पार्किन्सन रोग होतो.
या रोगाची चार मुख्य लक्षणे
हात, पाय, जबडा किंवा डोक्यात हादरे हातपाय कडक होणे हातापायांची हालचाल मंदावणे शरीराचे संतुलन बिघडणे म्हणजे चालण्यात अडचण निर्माण होणे
ही लक्षणं दिसल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा
पार्किन्सन रोगाच्या इतर लक्षणांमध्ये नैराश्य आणि इतर भावनिक बदलांचा समावेश असू शकतो. त्यामध्ये गिळण्यात अडचण, चघळणे आणि बोलणे, लघवी समस्या, बद्धकोष्ठता, त्वचेच्या समस्या आणि झोपेची अडचण अशा गोष्टी असू शकतात. या आजाराने ग्रस्त असलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये त्याची लक्षणे भिन्न असू शकतात. त्यामुळे यापैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.