Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips : गरोदरपणात कोणत्या पदार्थांचे सेवन आई आणि बाळासाठी ठरते लाभदायक ?

निरोगी बाळाच्या जन्मासाठी, गर्भवती महिलेने तिच्या आरोग्याकडे देखील विशेष लक्ष दिले पाहिजे. यासाठी गरोदरपणात स्त्रीच्या आहाराकडे विशेष लक्ष दिले जाते.

Health Tips : गरोदरपणात कोणत्या पदार्थांचे सेवन आई आणि बाळासाठी ठरते लाभदायक ?
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 4:12 PM

नवी दिल्ली : निरोगी बाळाच्या जन्मासाठी, गर्भवती महिलेने तिच्या आरोग्याकडे (health) देखील विशेष लक्ष दिले पाहिजे. यासाठी गरोदरपणात स्त्रीच्या आहाराकडे विशेष लक्ष दिले जाते. चांगले अन्न गर्भवती स्त्रीला तंदुरुस्त आणि निरोगी बनवते, तसेच अन्नाचा थेट परिणाम बाळाच्या (impact of food on baby) आरोग्यावर होतो. त्याचबरोबर सकस व पौष्टिक अन्नामुळे प्रसूतीदरम्यान होणाऱ्या समस्याही टाळता येतात. गर्भधारणेदरम्यान स्त्री जे काही खाते त्याचा परिणाम पोटातील बाळावर होत असतो. मुलांचा मेंदू तीक्ष्ण असतो, त्याला संपूर्ण पोषण मिळाले तर प्रसूतीनंतर सुदृढ बालकाचा जन्म होतो. अशा परिस्थितीत स्त्रीने गर्भधारणेदरम्यान काही गोष्टींचे सेवन करणे (food) आवश्यक आहे. ते कोणते हे जाणून घेऊया.

गर्भवती महिलांनी काय खावे ?

पालक

हे सुद्धा वाचा

हिरव्या भाज्यांमध्ये सर्व पोषक घटक असतात. यामध्ये पालकाचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. पालकामध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि अनेक खनिजे असतात. मुलांच्या विकासासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी पालकाचे सेवन आवश्यक आहे. गर्भवती महिलांनी पालकाचे सेवन करावे. यामुळे पोटातील बाळाला चांगले पोषण व आरोग्य आणि तीक्ष्ण मेंदू मिळतो.

अंडी

अंडीही खूप पौष्टिक असतात. त्यामध्ये प्रथिने तसेच जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. अंड्यांमध्ये व्हिटॅमिन डीचे प्रमाणही जास्त असते. बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी व्हिटॅमिन डी महत्वाचे आहे. म्हणूनच गरोदर महिलाही अंडी खाऊ शकतात.

बदाम

बदामामध्ये अनेक पोषक घटक असतात. बदाम खाल्ल्याने मन तीक्ष्ण होते. हे गर्भवती महिला आणि त्यांच्या मुलांना देखील लागू होते. बदामामध्ये अनेक पोषक तत्वं उपलब्ध असतात. गर्भारपणात स्त्रीने बदाम सेवन करावे. यामुळे मुलाच्या मेंदूचा चांगला विकास होतो.

ताजी फळं

फळं आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. ताज्या फळांपासून जीवनसत्त्वे मिळतात. अशा परिस्थितीत स्त्रीने गरोदरपणात संत्रा, केळी, आंबा, द्राक्षे, सफरचंद इत्यादी फळांचे सेवन करावे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही फळांचा रस बनवून पिऊ शकता. डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

दही

दह्याचे सेवन हे गरोदर महिलांसाठी आरोग्यदायी ठरते आणि बाळासाठीही फायदेशीर आहे. दह्यामध्ये व्हिटॅमिन सीसह भरपूर प्रथिने असतात. दररोज दह्याचे सेवन केल्याने प्रसूतीनंतर निरोगी आणि विकसित मूल होते.

दूध

लहान मुलं असोत वा प्रौढ, प्रत्येकाला दूध सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. एक ग्लास दुधात भरपूर पोषक तत्व असतात. गर्भवती महिला आणि तिच्या बाळासाठीही दूध खूप फायदेशीर आहे. यामुळे शरीराला ताकद मिळते. आरोग्य चांगले राहते व मुलाच्या मेंदूचा विकास होतो.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

'त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही', ठाकरेंचा भिडेंना टोला
'त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही', ठाकरेंचा भिडेंना टोला.
शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'
शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'.
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं.
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका.
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना.
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका.
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?.