दाढी केल्यानंतर तुरटीसोबत ही गोष्ट लावा, कोणताही साईड इफेक्ट होणार नाही!
दाढी केल्यानंतर अनेकांना स्किन ड्राय होणे, खाज सुटणे, पिंपल्स येणे, त्वचा लाल होणे अशा समस्या येतात. यावर घरच्या घरी एक उपाय आहे ज्यामुळे तुम्हाला असा काही त्रास होणार नाही.
मुंबई : पुरूषांना शेविंग केल्यानंतर अनेक समस्या निर्माण होताना दिसतात. यामध्ये स्किन ड्राय होणे, खाज सुटणे, पिंपल्स येणे, त्वचा लाल होणे अशा समस्या बहुतेक पुरूषांना निर्माण होतात. तर अशावेळी चेहर्यावर तुम्ही काही अशा गोष्टी लावू शकता ज्यामुळे या समस्या कमी होण्यास मदत होते. तर शेविंग केल्यानंतर चेहर्याला काय लावायचं याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
1. बर्फ लावा – पुरूषांनी शेविंग केल्यानंतर चेहर्यावर बर्फ लावला पाहीजे. यामुळे चेहऱ्यावरील खाज कमी होते. यासाठी बर्फाचा तुकडा घ्यायचा आणि तो चेहर्यावर लावायचा. बर्फ लावल्यानंतर चेहर्यावर होणारी जळजळही कमी होण्यास मदत होते.
2. कोरफडीचा गर लावा – शेविंग केल्यानंतर चेहरा हायड्रेट राहण्यासाठी चेहर्यावर कोरफडीचा गर लावा. कोरफडीचा गर लावल्यामुळे चेहरा मॉइस्चराइज राहतो. यासाठी कोमट पाण्यात कोरफडीचा गर टाका आणि ते चेहर्याला लावा. यामुळे शेविंग केल्यानंतर चेहरा सॉफ्ट होतो आणि खाजही कमी होते.
3. खोबरेल तेल- शेव केल्यानंतर चेहर्यावर खोबरेल तेल लावावे. या तेलात एंटीबॅक्टीरियल आणि एंटीइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे शेविंग केल्यानंतर त्वचा मॉइस्चराइज ठेवण्यास मदत करतात. तसंच खोबरेल तेल लावल्यामुळे चेहर्यावरील खाज थांबते आणि चेहर्यावर मुरूमही येत नाहीत.
Disclaimer : वरील दिलेली संपूर्ण माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. एकदा डॉक्टरांचा जरूर सल्ला घ्यावा. टीव्ही 9 मराठी याची पुष्ठी करत नाहीत.