धक्कादायक..अविश्वसनीय..जगातील 6 पैकी एक व्यक्ती नपुंसक; काय आहे जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल

Most Infertility rate in World : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे ज्याच्या अंतर्गत जगातील प्रत्येक सहावी महिला किंवा पुरुष वंध्यत्वाने ग्रस्त आहे.

धक्कादायक..अविश्वसनीय..जगातील 6 पैकी एक व्यक्ती नपुंसक; काय आहे जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Apr 05, 2023 | 9:24 AM

जिनेव्हा : जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) ने एक भयावह अहवाल प्रसिद्ध केला आहे. जगातील प्रत्येक सहावी महिला किंवा पुरुष हे वंध्यत्वाने ग्रस्त आहेत, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. WHO ने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीच्या आधारे, जगातील 17.5% लोकसंख्या वंध्यत्वाच्या (Infertility) समस्येने ग्रस्त आहे. श्रीमंत देशांमध्ये हा आकडा 17.8% आहे, तर गरीब देशांमध्ये 16.5% लोक आयुष्यभर वंध्यत्वाला बळी पडतात.

WHO नुसार वंध्यत्वाची व्याख्या काय ?

या दरम्यान, जगात सुमारे 12.6% लोक आहेत जे काही काळ वंध्यत्वाच्या समस्येशी झुंजत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येनुसार, गर्भनिरोधकाशिवाय बाळासाठी वर्षभर प्रयत्न करूनही यश न मिळाल्यास एखादी व्यक्ती वंध्यत्वाची शिकार मानली जाते.

हे सुद्धा वाचा

133 अभ्यासांच्या आधारे जारी करण्यात आला अहवाल

जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेली ही आकडेवारी 1990 ते 2021 या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या 133 वेगवेगळ्या अभ्यासांच्या विश्लेषणाच्या आधारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यापैकी 66 अभ्यास पती-पत्नीवर करण्यात आले, तर 53 अभ्यास अशा लोकांवर करण्यात आले जे विवाहित नाहीत आणि त्यांच्या जोडीदारांसोबत राहतात. असे 11 अभ्यास होते ज्यांच्या वैवाहिक स्थितीबद्दलची माहिती उघड झाली नाही.

पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये वंध्यत्वाची समस्या जास्त असते

या अभ्यासाच्या परिणामांनुसार, वंध्यत्वाची समस्या पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त दिसून आली. मात्र या अभ्यासात समाविष्ट असलेल्या एकूण लोकांमध्ये महिलांची संख्या जास्त होती. या अभ्यासात सहभागी झालेले बहुतेक लोक युरोपमधील होते, तेथून सुमारे 35% लोक सहभागी झाले होते, तर एकूण अभ्यासापैकी 9% दक्षिण आशियातील होते, ज्यामध्ये भारताचा देखील समावेश होतो.

अतिशय खर्चिक आहे उपचार

भारतातील निपुत्रिक दांपत्य उपचारासाठी आपल्या खिशातून पैसे खर्च करत आहेत. एका आयव्हीएफ सायकलची किंमत खूप जास्त आहे कारण लोक सहसा खाजगी केंद्रांमध्ये अशा उपचारांसाठी जातात. IVF सारखी प्रक्रिया सरकारी रुग्णालयांमध्ये जवळजवळ नगण्य आहे.

कोणता देश उपचारांवर सर्वाधिक खर्च करतो ?

डब्ल्यूएचओच्या अभ्यासानुसार, मूल-बाळ होण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी भारतात सर्वाधिक खर्च केला जातो. भारतात, एखादी व्यक्ती ARTसायकलसाठी (Assisted reproductive technology) त्याच्या सरासरी वार्षिक उत्पन्नापेक्षा 166 पट जास्त खर्च करते. जगभरात बाळ होण्याच्या इच्छेसाठी उपचारावर होणाऱ्या खर्चाचा अंदाज असा आहे की काही ठिकाणी USD 2109 म्हणजेच 1 लाख 73 हजार रुपये खर्च केले जातात तर काही ठिकाणी 15 लाखांपुढेही खर्च होतो. भारतात होणारा खर्च हा सर्वाधिक आहे. भारतात, एआरटी सायकलची किंमत 18592 डॉलर्स म्हणजे सुमारे 15 लाख 30 हजार रुपये इतकी आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.