Health : हिवाळ्यामध्ये अचानक जाणवू लागतात वेदना, करा हे सोपे उपाय!
हिवाळ्यामध्ये विटामिन डी च्या कमतरतेमुळे आपले शरीर कडक होते. त्यामुळे आपल्या सांध्यांमध्ये, गुडघ्यांमध्ये वेदना सुरू होतात. तर या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी शरीरामध्ये विटामिन डी असणं खूप आवश्यक आहे. तर या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आणि शरीराला विटामिन डी मिळण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
मुंबई : सध्या थंडीचे दिवस सुरू झाले आहेत. थंडी म्हटलं की ताप, सर्दी अशा समस्या निर्माण होताना दिसतात. फक्त एवढ्या समस्या नाही तर थंडीमध्ये सांधेदुखी, गुडघेदुखी या समस्यांना देखील आमंत्रण मिळतं. थंडी वाजल्यामुळे आपले शरीर जड होते त्यामुळे सांधेदुखी किंवा गुडघेदुखीची समस्या निर्माण होताना दिसते. हिवाळ्यामध्ये सूर्यप्रकाश कमी असतो त्यामुळे आपल्या शरीराला विटामिन डी मिळत नाही. त्यामुळे याचा परिणाम आपल्या हाडांवरती होतो.
सांधेदुखी, गुडघेदुखी सारख्या समस्यांनी लोकं त्रस्त होतात. पण या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या शरीराची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. हिवाळ्यामध्ये विटामिन डी च्या कमतरतेमुळे आपले शरीर कडक होते. त्यामुळे आपल्या सांध्यांमध्ये, गुडघ्यांमध्ये वेदना सुरू होतात. तर या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी खाली दिलेल्या गोष्टी लक्षात ठेवा.
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तुमच्या आहारामध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश करा. यामुळे तुमच्या शरीराला विटामिन डी मिळण्यास मदत होईल. तुमच्या शरीरात विटामिन डी वाढवण्यासाठी आहारामध्ये नाचणीच्या पिठाचा समावेश करा. नाचणीच्या पिठामध्ये कॅल्शियम आणि लोह मुबलक प्रमाणात असते, जे तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरते.
हिवाळ्यामध्ये शरीराला उबदार ठेवण्यासाठी उबदार कपडे घालणे गरजेचं आहे. यामुळे तुमचं शरीर जड होत नाही आणि सांधेदुखी सारख्या समस्या निर्माण होत नाहीत. थंडीच्या दिवसांमध्ये योगा करा. योगा केल्यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते तसेच तुमच्या शरीरातील रोग प्रतिकार शक्ती देखील मजबूत राहते.
हिवाळ्यामध्ये मेथीचे लाडू खाणे खूप फायदेशीर ठरते. मेथीचे लाडू खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराला विटामिन डी मिळण्यास मदत होते. थंडीच्या दिवसांमध्ये तुमच्या आहारात तिळाच्या तेलाचा समावेश करा. तिळाचे तेल तुमच्या शरीरातील हाडे मजबूत करण्यास मदत करते.
शरीरामध्ये विटामिन डी असणं खूप आवश्यक आहे. तर या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आणि शरीराला विटामिन डी मिळण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे याबाबत आपण जाणून घेणार आहोत.