लहान वयातच मुलांच्या दातांना कीड का लागते बरं? जाणून घ्या कारण आणि उपाय
लहान मुलांच्या दात ठराविक वयात किडतात, हे तुम्ही अनेकदा पाहिलं आहे. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का, की विशिष्ट वयात मुलांना या समस्येचा का सामना करावा लागतो. या लेखात आपण याच विषयावर चर्चा करुन मुलांना या समस्येपासून कसे वाचवता येईल, हे जाणून घेणार आहोत.
ठराविक वयात लहान मुलांच्या दाताची जास्त काळजी घ्यावी लागत असते, अनेकदा मुलांच्या दातांना कीड (Teeth decay) लागत असते. कीडच्या समस्येपासून वाचण्यासाठी अनेक आई-वडील आपल्या मुलांना जास्त गोड देत नाहीत. परंतु अनेकदा मुलांना मिठाई आणि गोड (Sweet) पदार्थ कमी दिले, तरीही त्याच्या दातांना कीड लागतच असते. मुलांच्या दात आणि तोंडाची स्वच्छता नीट केल्यास त्याच्या दातांतील जंत टाळता येऊ शकतात. 3 ते 5 वर्षे वयाच्या मुलांच्या दातांना कीड होण्याची अधिक शक्यता असते. तुम्ही कधी विचार केला आहे का की मोठ्या मुलांच्या किंवा प्रौढांच्या (Adults) तुलनेत फक्त 3 ते 5 वर्षांच्या मुलांनाच दातांना कीड का लागते?
दुधाच्या दातात पोकळी
दुधाच्या दातांचे ‘इनॅमल’ पातळ आणि मऊ असते. त्यांच्यावर पोकळी निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे दुधाच्या दातांवर पोकळी निर्माण होण्याचा धोका वाढतो. दुसरीकडे, दुधाच्या दातांमध्ये पोकळी निर्माण झाल्यामुळे, त्यांचा त्रास जाणवण्याचा धोका असतो. म्हणूनच दातांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
जास्त गोड हानिकारक
दिवसभर गोड पदार्थ खाण्यापेक्षा एकाच वेळी तेवढ्याच प्रमाणात गोड खाणे वाईट आहे. त्याचप्रमाणे, जेवल्यानंतर लगेच गोड खाल्ल्यास ते अधिक हानिकारक ठरु शकते. स्टार्च आणि साखरयुक्त पदार्थ मुलाच्या तोंडात बराच वेळ राहतात. कँडी किंवा टॉफी सारखे कठीण घटक बाळाच्या दातांना जास्त हानिकारक असतात. ते दाताला चिपकून राहत असल्याने सहज निघत नाहीत.
किडीपासून असे करा संरक्षण
सुरुवातीपासूनच मुलांचे दात स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. त्यांना दिवसातून दोनदा चांगल्या टूथपेस्टने ब्रश करायला सांगा. बाळाच्या दातांवर काळे किंवा पांढरे डाग पडणे, दात दुखणे, मुलांची चिडचिड होणे, दातांना थंड घटकांचा त्रास होणे, तोंडातून दुर्गंधी येणे आदी दात किडन्याची लक्षणे आहेत.
काय खायला द्यावे
गोड स्नॅक्स, कँडी आणि ज्यूस इत्यादी वस्तू मुलांना देण्याचे टाळावे, मुलाने या गोष्टी खाल्ल्या असतील, तर त्याला नंतर दात स्वच्छा धुवायला सांगा. दररोज भरपूर पाणी प्या. पाणी हानिकारक जीवाणू बाहेर काढते त्यामुळे दातांवर घाण जमा होत नाही.