जेवल्यानंतर का वाजते थंडी? जाणून घ्या शास्त्रीय कारण

जेवल्यानंतर थंडी जाणवणे ही एक सामान्य गोष्ट आहे आणि शरीराचे नैसर्गिक प्रतिक्रिया पचनाच्या वेळी शरीरातील रक्तप्रवाह पचनसंस्थेकडे केंद्रित होते त्यामुळे बाहेरील अवयवांना होणारा रक्तप्रवाह कमी होऊन थंडी जाणवू लागते याला थर्मिक इफेक्ट असे म्हणतात.

जेवल्यानंतर का वाजते थंडी? जाणून घ्या शास्त्रीय कारण
Follow us
| Updated on: Dec 03, 2024 | 1:18 PM

जेवल्यानंतर लोकांना अनेकदा थंडीचा जाणवू लागते. जेवल्यानंतर थोडंसं थंड वाटणं ही सामान्य गोष्ट आहे असं सगळ्यांनाच वाटतं पण तुम्हाला खूप थंड वाटत असेल. तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. परंतु जर तुम्हाला थोडीशी थंडी जाणवत असेल तर हे सामान्य आहे. याचे कारण शरीरातील ऊर्जा संतुलन आणि थर्मोरेग्युलेशन म्हणजे शरीराचे तापमान राखण्याच्या प्रक्रियेशी संबंधित आहे. हे पूर्णपणे समजून घेण्यासाठी काही वैज्ञानिक बाबी समजून घ्याव्या लागतील.

जेवल्यानंतर शरीराला त्याचे पचन, शोषण आणि चयापचय करण्याचे काम करावे लागते. या प्रक्रियेला अन्नाचा थर्मिक इफेक्ट म्हणतात. अन्नाचे पचन झाल्यावर शरीरातील रक्तप्रवाह पचन संस्थेकडे अधिक केंद्रित होतो. त्यामुळे त्वचा आणि बाह्य अवयवांमध्ये रक्त प्रवाह कमी होतो. त्यामुळे शरीराचे बाह्य तापमान कमी होऊन थंडी जाणवते. हे प्रत्येकाच्या बाबतीत घडत असून हे सामान्य आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून ही प्रक्रिया शरीराची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे आणि चिंतेचे कारण नाही. परंतु यामुळे वारंवार आणि असामान्य थंडी वाजत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

जेवणाचाही होऊ शकतो परिणाम

कधी कधी जेवणाच्या प्रकारावर देखील ते अवलंबून असते. कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने पचवण्यासाठी जास्त ऊर्जा लागते. त्यामुळे शरीरात जास्त उष्णता निर्माण होते. पण काही वेळा ही ऊर्जा त्वचेपर्यंत पोहोचत नाही आणि शरीरातच राहते त्यामुळे ही अनेक वेळा थंडी जाणवू लागते. दुसरीकडे जर तुम्ही थंड पाणी आईस्क्रीम किंवा थंड पदार्थ खाल्ले तर ते तुमच्या शरीराचे तापमान तात्पुरते कमी करू शकते. त्यामुळे थंडी वाजणे स्वाभाविक आहे.

साखर आणि इन्सुलिन असू शकते कारण

जेवणानंतर साखरेची पातळी वाढते आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी इन्सुलिन हार्मोन सोडला जातो. इन्सुलिन शरीरातील उर्जेवर परिणाम करतो आणि रक्तप्रवाह कमी करू शकतो. यामुळे थंडी वाजू शकते. जर तुम्ही जड अन्न खाल्ले तर तुमचे शरीर विश्रांतीच्या अवस्थेत जाते त्याला पोस्टप्रान्डियल डिप असे म्हणतात. यावेळी हृदयाचे ठोके आणि ऊर्जा उत्पादन काही काळ बंद होऊ शकते त्यामुळे थंडी वाजू शकते.

इंटरमिटेंट फास्टिंगही ठरू शकते कारणीभूत

इंटरमिटेंट फास्टिंग करणारे लोक बरेच दिवस उपाशी राहतात. त्यामुळे त्यांच्या रक्तातील साखरेचे पातळी कमी होऊ शकते. यामुळे शरीरावर जास्त ताण येतो आणि शरीराच्या पचनाच्या वेळी उष्णता निर्माण करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. जे लोक दीर्घकाळ इंटरमिटेंट फास्टिंग करतात त्यांना जेवल्यानंतर थंडी वाजते. कारण त्यांचे शरीर अचानक पचनक्रियेसाठी तयार नसते.

मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.