Corona : थंडीतच का वाढतात कोरोनाच्या केसेस ? एक्स्पर्ट काय सांगतात, जाणून घ्या
कोविडच्या वाढत्या प्रकरणांमुळे सर्व राज्य पुन्हा एकदा हाय अलर्टवर गेली आहेत. या नव्या व्हेरिअंटमुळे होणारा धोका लक्षात घेता अनेक राज्यांनी सतर्कतेचा इशारा देत मास्क वापरण्याचा सल्ला नागरिकांना दिला. पण कोविडची प्रकरणं थंडीतच का वाढतात, असा प्रश्न अनेकांना पडतो.
मुंबई | 22 डिसेंबर 2023 : चीनमध्ये न्यूमोनियाच्या वाढत्या प्रकरणांनी हिवाळ्याची सुरुवात झाली असतानाच आता भारतातही कोविडच्या प्रकरणांनी वेग घेतला आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या केसेसमध्ये वेगाने वाढ होताना दिसत असून देशभरात अनेक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. देशात याची सुरुवात केरळपासून झाली, परंतु आता कोरोनाचा नवीन व्हेरियंट JN.1 सापडल्यापासून तो देशभरात पसरला आहे. महाराष्ट्रातही याच्या अनेक केसेस पहायला मिळत आहेत. कोरोनाचा धोका आता कोकणापासून मराठवाड्यापर्यंत पोहचला आहे. नवीन व्हेरिअंटचा पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळला होता
थंडीतच का वाढतो कोविड ?
कोविडच्या वाढत्या प्रकरणांमुळे सर्व राज्य पुन्हा एकदा हाय अलर्टवर गेली आहेत. या नव्या व्हेरिअंटमुळे होणारा धोका लक्षात घेता अनेक राज्यांनी सतर्कतेचा इशारा देत मास्क वापरण्याचा सल्ला नागरिकांना दिला. पण कोविडची प्रकरणं आणि त्याचा नवा व्हेरिअंट फक्त थंडीतच का येतो, असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडला आहे. कोविड फक्त हिवाळ्यातच पाय पसरण्याचे कारण काय?
एक्स्पर्ट्स काय सांगतात ?
यासंदर्भात दिल्लीतल सफदरजंग हॉस्पिटलमधील कम्यूनिटी मेडिसिन डिपार्टमेंट मध्ये एचओडी प्रोफेसर डॉ. जुगल किशोर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी बऱ्याच गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्यांच्या सांगण्यानुसार, साधारणत: थंडीच्या काळात रेस्पिरेटरी इन्फेक्शन वाढतं. याच काळात फ्लूच्या केससही बऱ्याच वाढतात. त्यानंतर बऱ्याच वेळा लोकांना सर्दी-खोकला आणि ताप येण्याचा त्रास होतो. अशा वेळी लोकं तपासणीसाठी रुग्णालयात गेल्यावर त्यांची कोविड टेस्टही केली जाते. जास्त टेस्ट्स झाल्याने अनेक केसेसचा उलगडा होतो. (कोविडचा) हा व्हायरस शरीरात असल्यानेच, टेस्ट्स वाढल्या तर कोविड केसेसही पुढे येतात. याच कारणामुळे थंडीत कोरोनाच्या केसेस वाढल्याचे पहायला मिळते. सध्या सापडलेला नवा व्हरिअंटही केसेस वाढण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो.
इम्युनिटी कमकुवत असणे
हिवाळ्यात अनेकदा लोकं संसर्गाला बळी पडतात आणि त्यामुळे लोकांची रोगप्रतिकारक शक्तीही कमकुवत होते, जे संसर्ग होण्याचे एक प्रमुख कारण आहे. तसेच जास्त तपासणी झाल्यामुळेही कोविडच्या जास्त केसेस उजेडात येतात.
नव्या व्हेरिअंटने वाढवली चिंता
कोविडचा JN.1 हा नवा व्हेरिअंट अतिशय वेगाने पसरत आहे. केरळ नंतर, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, गोवा, पुडुचेरी, गुजरात, तेलंगणा, पंजाब, दिल्ली आणि राजस्थानमधूनही त्याची प्रकरणे समोर येत आहेत. अशा परिस्थितीत लोकांनी पुन्हा एकदा सावधगिरी बाळगणे आणि कोविडच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. गर्दीत बाहेर जाणे टाळणे, मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे अशी खबरादारी वेळोवेळी घेतली पाहिजे.