Hand veins : तुमच्या हातावरील नसही फुगते का ? जाणून घ्या यामागचे कारण
कधीकधी आपल्या हातांवरील नस खूप फुगलेली दिसू लागते. मात्र असे होण्यामागचे नेमके कारण काय, हे जाणून घेऊया.
Visible Hand Veins Causes : हातांची नस अथवा शीर फुगणे (hand veins) ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. त्यामुळे तुमच्या दैनंदिन कामात (routine work) काही व्यत्यय येत नाही. सर्व कामे तुम्ही नीट करू शकता. मात्र काही लोक असे असतात की ज्यांच्या हातांवरील नस खूप जास्त फुगलेल्या (visible) दिसतात आणि त्यामुळे वेदनाही होऊ शकतात. अशा परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम (problems) होऊ शकतात. भविष्यात काही गंभीर आजार होऊ नये म्हणून अशा परिस्थितीकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांना दाखवावे. मात्र हातांच्या नसा नेमक्या का फुगतात, त्यामागचे कारण काय, हेही जाणून घेऊया.
हाताच्या नस फुगण्याचे कारण –
- एखाद्या व्यक्तीचे वजन कमी झाल्यासही त्या व्यक्तीच्या हातावरील नस दिसू लागते. ज्यांचे वजन कमी होते, त्यांची नस अथवा शीर स्पष्टपणे दिसू लागते. फ्लेबिटिस ही एक मेडिकल कंडीशन आहे. त्यामध्येही हातावरील शीरा दिसू शकतात. अशा परिस्थितीत हाता-पायांवर सूज येऊ लागते.
- जेव्हा तुम्ही वर्कआऊट किंवा व्यायाम करता, तेव्हाही हाता-पायांवरील नस दिसू शकते. शरीराचे तापमान वाढते. त्यावेळी शरीरातील स्नायू कडक होतात आणि नस फुगते.
- नस फुगणे हे अनुवांशिकही असू शकते. अनुवांशिकतेमुळेही हाताच्या नसा दिसू लागतात. जर तुमच्या घरी तुमचे आई-वडील किंवा इतर कोणालाही ही समस्या असेल तर तुमच्याही शरीरावरील नस दिसू शकते.
- वाढत्या वयामुळेही ही समस्या होऊ शकते. खरंतर वयामुळे नसांमधील व्हॉल्व कमकुवत होतात, ज्यामुळे रक्त गोठू लागते. व शिरा दिसू लागतात.
हे सुद्धा वाचा