Mosquito Bite : एक मच्छर आदमी को… मच्छर चावल्यावर त्वचा का सूजते माहित्ये का?; कारण लैच भारी हाय

डास चावल्यामुळे खाज सुटते आणि त्यामुळे आपण खूप त्रस्त होतो. डास जिथे चावतो , तो भाग लगेच लाल होऊ सुजतो. पण असे का घडते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? चला, त्यामागील शास्त्र जाणून घेऊया.

Mosquito Bite : एक मच्छर आदमी को... मच्छर चावल्यावर त्वचा का सूजते माहित्ये का?; कारण लैच भारी हाय
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 27, 2023 | 10:15 AM

नवी दिल्ली : उन्हाळा सुरू झाला की डासांची संख्या (Mosquito bite) वाढते. उन्हाळ्यात अनेकदा लोकांना डासांचा त्रास होतो. घरात, बाहेर सर्वत्र डासांचा उच्छाद असतो. डास चावल्यामुळे खाज सुटते आणि त्यामुळे आपण खूप त्रस्त (itching on skin) होतो. डास जिथे चावतो , तो भाग लगेच लाल होऊ सुजतो. पण असे का घडते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? चला, त्यामागील शास्त्रीय कारण (scientific reason behind mosquito bite) जाणून घेऊया.

या कारणामुळे सुजते त्वचा

हे सुद्धा वाचा

जेव्हा एखादा डास आपल्याला चावतो तेव्हा आपले संरक्षण करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय होते. यामुळे आपली त्वचा सुजते. खरंतर, जीवाणू, विषाणू यांसारख्या कोणत्याही बाह्य धोक्यापासून आपल्या शरीराचे संरक्षण करण्याचे काम त्वचेचे असते. त्यामुळे जेव्हा आपल्याला डास चावतो तेव्हा तो स्किन ब्रेक करतो. डास चावल्यावर त्याची लाळ आपल्या शरीराच्या आतमध्ये पोहोचते आणि आपले शरीर तो (लाळ) बाहेरील पदार्थ म्हणून ओळखतो. आणि या परदेशी अथवा बाहेरच्या पदार्थामुळे शरीराला कोणतीही इजा होऊ नये, यासाठी लगेचच आपली रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय होते.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, जेव्हा एखादा डास आपल्याला चावतो तेव्हा आपली रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय होते. ज्या ठिकाणी डास चावतो, तेथे रोगप्रतिकारक शक्ती एक विशेष प्रकारचे केमिकल, हिस्टामाइन ( Histamine) पाठवते. ते हिस्टामाइन आपल्या शरीराचे संरक्षण करण्यास मदत करते.

कसे असते हिस्टामाइनचे कार्य ?

जेथे डास चावतो, तेथे हिस्टामाइनमुळे रक्तप्रवाह आणि पांढऱ्या रक्तपेशी वाढतात. या कारणामुळे आपल्याला त्या भागात खाज येते आणि त्यामुळेच आपली त्वचा लाल होऊन फुगते अथवा सुजते. शरीरातील पांढऱ्या रक्तपेशी शरीराला कोणत्याही रोगजनक, सूक्ष्मजंतू आणि परदेशी पदार्थांशी लढण्यास मदत करतात.

डास का चावतात ?

माणसांचे रक्त पिण्यासाठी डास त्यांना चावतात. मानवी रक्तामध्ये आढळणारे पोषक घटक हे मादी डासांना पुनरुत्पादनासाठी आवश्यक अंडी तयार करण्यास मदत करतात. त्यामुळे केवळ मादी डास हे माणसांना चावतात. तसेच जर डासांना तुमच्या शरीराचा वास आवडत असेल तर ते तुमच्याकडे जास्त आकर्षित होतील.

अशी घ्या काळजी

– डास चावू नयेत म्हणून संध्याकाळच्या वेळेस घराची दारं, खिडक्या घट्ट बंद कराव्यात.

– घराच्या आसपास, झाडांच्या कुंड्यांमध्ये पाणी साचू देऊ नका. तेथे डासांची अंडी असण्याची शक्यता वाढते.

– डॉक्टरांच्या सल्ल्याने मॉस्किटो क्रीमचा वापर करू शकता.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.