Health : हिवाळ्यात फक्त 4 खजूर खाल्ल्याचे आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
खजूर खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला जीवनसत्व, कॅलरी, फायबर मिळते. तसंच खजूरमध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात जे आपलं हृदय निरोगी ठेवतात. तर आता आपण खजूर खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत. जेणेकरून हिवाळ्यात तुमचं आजारांपासून संरक्षण होईल आणि तुमच्या शरीराला उर्जा मिळेल.
मुंबई : सध्या थंडीचे दिवस सुरू झाले आहेत. थंडीच्या या दिवसांमध्ये अनेक आजार निर्माण होतात. मग सर्दी, खोकला, ताप असे अनेक आजार निर्माण होताना दिसतात. तर अशावेळी आजारांपासून वाचण्यासाठी आणि आपल्या शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी तुमच्या आहारात खजूरचा समावेश करा. खजूर हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते.
हिवाळ्याच्या या दिवसांमध्ये प्रत्येकाने रिकाम्या पोटी खजूर खाणं गरजेचं आहे. प्रत्येकाने दररोज किमान चार खजूर खावे. मग तुम्ही रात्रभर खजूर पाण्यात भिजवून सकाळी ते खाऊ शकता. तसंच तुम्ही सकाळी देखील तुमच्या आहारात खजूरचा समावेश करू शकता. तसंच तुम्ही न भिजवताही तसंच खजूर खाऊ शकता.
खजूरमध्ये अनेक पोषक तत्व आढळतात. यामध्ये मग कॅल्शियम, प्रथिने, लोह, व्हिटॅमिन के, सोडियम असे गुणधर्म आढळतात. तसंच खजूर व्हिटॅमिन बी 6 चा देखील स्त्रोत आहे. सोबतच खजूरमध्ये अँटिऑक्सिडंट आढळतात. यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते, आपले हृदय निरोगी राहते.
खजूर खाल्ल्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. तसंच आपल्या शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी होते. आपल्या शरीरातील हाडे मजबूत होतात. खजूरमध्ये व्हिटॅमिन के असते जे आपल्या शरीरातील रक्त घट्ट होण्यापासून रोखते. तर खजूरमुळे आपले डोळे स्वच्छ राहतात आणि डोळ्याची संबंधित आजार नाहीसे होतात. सोबतच कर्करोग, मधुमेह या आजारांचा धोका देखील कमी होतो. त्यामुळे प्रत्येकाने दररोज खजूर खाणं खूप गरजेचं आहे.