पुरुषांपेक्षा महिलांनाच हा आजार का होतो जास्त ? ‘ही’ लक्षणे तुम्हालाही दिसत असतील तर व्हा सावध

Iron Deficiency : लोहाच्या कमतरतेमुळे निर्माण होणारा अशक्तपणा अर्थात ॲनिमिया ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये रक्तातील लाल रक्तपेशींची कमतरता असते आणि शरीराच्या ऊतींमध्ये पुरेसा ऑक्सिजन पोहोचत नाही. ही समस्या महिलांमध्ये सामान्य आहे.

पुरुषांपेक्षा महिलांनाच हा आजार का होतो जास्त ? 'ही' लक्षणे तुम्हालाही दिसत असतील तर व्हा सावध
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Apr 15, 2023 | 9:11 AM

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) सांगण्यानुसार, जगातील एकूण लोकसंख्येपैकी एक षष्ठांश लोक अशक्तपणा अर्थात ॲनिमिया (anemia) शिकार आहेत. ही समस्या महिलांमध्ये अधिक आढळते. भारतात दर तीनपैकी महिला ॲनिमियाच्या समस्येने त्रस्त आहेत. खरंतर, जेव्हा शरीराच्या पेशींना सक्रिय राहण्यासाठी ऑक्सिजनची (oxygen) आवश्यकता असते, तेव्हा लाल रक्तपेशींमध्ये असलेले हिमोग्लोबिन प्रत्येक अवयवापर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करते. परंतु, जेव्हा शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे लाल रक्तपेशी आणि हिमोग्लोबिनच्या उत्पादनावर परिणाम होतो, तेव्हा शरीर आणि मेंदूच्या कार्यक्षमतेवर वाईट परिणाम होऊ लागतो. याला ॲनिमिया म्हणतात.

महिलांमध्ये ॲनिमिया होण्याची मोठी कारणं

महिलांना दर महिन्याला मासिक पाळी येते. जेव्हा शरीरातून जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होतो तेव्हा महिलांमध्ये लोहाची कमतरता आणि अॅनिमियाचा धोका वाढतो. एवढेच नाही तर गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूतीमुळेही महिलांमध्ये निमिया होतो. अशा परिस्थितीत जर त्यांनी सकस आहार घेतला नाही आणि त्यांच्या दैनंदिन गरजेनुसार लोहाचा पुरवठा होत नसेल तर ही समस्या अधिक धोकादायक रूप धारण करू शकते.

हे सुद्धा वाचा

ॲनिमियाची लक्षणे

1) रक्ताच्या कमतरतेमुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होऊ लागते.

2) शरीरात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अधिक थकवा जाणवतो.

3) त्वचेचा रंग पिवळा किंवा पांढरा होऊ लागतो आणि डोळ्यांभोवतीचा भाग काळा होऊ लागतो.

4) शरीरात ऊर्जेची कमतरता असते आणि श्वास घेण्यास त्रास होतो.

5) हृदयाचे ठोके जलद पडतात आणि रक्तदाब कमी राहतो.

6) मनःस्थिती बदलते आणि उदासीनता जाणवते.

7) भूक कमी लागते, वारंवार चक्कर येते

8) हात पाय थंड राहून डोकेदुखी, डोकं हलकं होणं असा त्रास जाणवतो

9) नखं तुटायला लागतात आणि त्वचेची कातडी निघू लागते.

ॲनिमियाचा त्रास कमी होण्यासाठी घरगुती उपाय

– बीटाचा रस प्यायल्याने ॲनिमियाची समस्या दूर होऊ शकते.

– तुमच्या आहारात पालक, काळे यांसारख्या लोहयुक्त हिरव्या भाज्यांचा अधिकाधिक समावेश करा.

– रोज सकाळी नाश्त्यात दोन ते तीन खजूर आणि 10-12 दाणे मनुके खा.

– रोज पाण्यात भिजवलेले हरभरे गुळासोबत खावे. गूळ आणि हरभरा यामध्ये भरपूर लोह असते. मात्र त्यानंतरही काही अडचण आल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. )

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.