Period Pain : ‘त्या’ 4 दिवसांत पोटात दुखतंय ? अशा सवयींमुळे आणखीनच वाढतील तुमच्या वेदना

मुली किंवा महिला दररोज अशा काही गोष्टींचा अवलंब करतात, ज्यामुळे त्यांच्या मासिक पाळीच्या वेदना आणखीनच वाढू शकतात. याला वाईट सवयी असेही म्हणता येईल. अशा कोणत्या चुका करणे टाळावे, ते जाणून घेऊया.

Period Pain : 'त्या' 4 दिवसांत पोटात दुखतंय ? अशा सवयींमुळे आणखीनच वाढतील तुमच्या वेदना
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Mar 09, 2023 | 10:09 AM

नवी दिल्ली : मासिक पाळी (menstrual cycle) हा महिलांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग असतो. प्रत्येक महिन्यात त्यांना याला सामोरे जावे लागतेच. यादरम्यान बहुतांश महिलांना पोटदुखी, पाठदुखी, चिडचिड, तणाव , डोक दुखणं अशा अनेक समस्यांचा (period cramps) सामना करावा लागतो. मात्र महिलांच्या या वेदनांसाठी त्या स्वत:च जबाबदार आहेत, अस कोणी सांगितलं तर ? हो, हे खरं आहे. रोजच्या जीवनात महिला किंवा मुली काही अशा गोष्टी करतात किंवा काही गोष्टींचा अवलंब करतात, ज्यामुळे त्यांच्या मासिक पाळीच्या वेदना (period pain) आणखीनच वाढू शकतात. याला वाईट सवय असेही म्हणता येईल. जरी हे नकळत होत असले तरी पाळीच्या काळात त्याचा परिणाम दिसून येतो व त्यामुळे त्यांच्या वेदनांमध्ये भर पडते.

महिला अथवा मुलींनी अशा कोणत्या चुका करणे टाळावे, ते जाणून घेऊया.

हे सुद्धा वाचा

अनहेल्दी आहार

2018 साली करण्यात आलेल्या एका अभ्यासात सुमारे 70 विद्यापीठातील मुलींचा समावेश करण्यात आला होता. तुर्की संशोधकांना असे आढळून आले की ज्या महिला अथवा मुलींना खारट स्नॅक्स आणि मिठाई खाण्याची सवय अथवा व्यसन आहे, त्यांना पाळीच्या काळात अधिक काळ वेदना होतात. या अस्वास्थ्यकर आहाराऐवजी ओमेगा-6 फॅटी ॲसिड असलेल्या गोष्टींचा आहारात समावेश करायला हवा. म्हणूनच फास्ट फूडचे सेवन सोडावे. आणि भाज्या, तसेच पिठापासून बनवलेले पदार्थ खाण्याची सवय महिलांनी अंगिकारली पाहिजे.

मानसिक तणाव

तणावामुळे आपल्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते आणि त्यामुळेमासिक पाळीचे चक्रही बिघडते. स्ट्रेस म्हणजेच तणावामुळे शरीराचे आरोग्य अनेक प्रकारे बिघडते. जर तुम्हाला दर महिन्याला जास्त काळ वेदना होत असतील तणाव हे तर त्यामागील एक कारण असू शकते.

धूम्रपान करण्याची घातक सवय

धूम्रपान करणे हे आपल्या फुफ्फुसासाठी विषासारखे आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे, परंतु तरीही बहुतांश लोकांना धूम्रपान करण्याचे व्यसन असते. तज्ज्ञांच्या मते, सिगारेटच्या सवयीमुळे शरीरात अनेक बदल होतात आणि त्याचा परिणाम पीरियड सायकलवरही होतो. अशा परिस्थितीत ज्या महिला अथवा मुली धूम्रपान करतात, त्यांच्या वेदना वाढणे निश्चितच आहे.

लठ्ठपणा

संशोधकांच्या मते, तुमचे वजन जास्त असेल किंवा तुम्ही लठ्ठ असाल तरी त्यामुळेही मासिक पाळीच्या वेदना वाढू शकतात. ऑस्ट्रेलियन डॉक्टरांनी सुमारे 13 वर्षे अभ्यास केला आणि असे आढळले की ज्या महिलांनी वजन कमी करण्याचा प्रयत्न केला त्यांना मासिक पाळीच्या वेदना कमी होतात. डॉक्टर म्हणतात की मासिक पाळीतील वेदना आणि वजन यांचा थेट संबंध नाही, परंतु अनेक सिद्धांतांमध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे.

बर्थ कंट्रोलचा वापर

बर्थ कंट्रोल अथवा गर्भनिरोधक यांचा वापरक करत असताना स्त्रिया मासिक पाळीच्या वेदना किंवा क्रॅम्प्स येण्याची तक्रार करतात. परंतु काही विशिष्ट प्रकारांमुळे लक्षणे आणखी वाईट होऊ शकतात. एनएचएसच्या सांगण्यानुसार, कॉपर कॉईल हे एक प्रकारचे बर्थ कंट्रोल किंवा गर्भनिरोधक आहे ज्यामुळे हेवी पीरियड्स येऊ शकतात.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.