Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cancer Day 2024 : कर्करोगामुळे दरवर्षी होतो लाखो रूग्णांचा मृत्यू, तुम्हीसुद्धा आहात का कर्करोगाच्या उंबरठ्यावर?

Cancer symptoms जगभरातील कर्करोगाच्या वाढत्या धोक्याबद्दल लोकांना जागरूक आणि शिक्षित करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन (World Cancer Day) साजरा केला जातो. कर्करोगाचे अनेक प्रकार असू शकतात, त्याचा धोका सर्व वयोगटातील लोकांना दिसून येत आहे.

World Cancer Day 2024 : कर्करोगामुळे दरवर्षी होतो लाखो रूग्णांचा मृत्यू, तुम्हीसुद्धा आहात का कर्करोगाच्या उंबरठ्यावर?
जागतिक कर्करोग दिनImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 04, 2024 | 2:45 PM

मुंबई : कर्करोग ही जागतिक स्तरावर वेगाने वाढणारी गंभीर आणि जीवघेणी आरोग्य समस्या आहे, ज्यामुळे दरवर्षी लाखो मृत्यू होतात. ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजचा अंदाज आहे की 2017 मध्ये 9.56 दशलक्ष (95.6 लाख) लोकांचा कर्करोगामुळे अकाली मृत्यू झाला. जगातील प्रत्येक सहावा मृत्यू कर्करोगामुळे होतो. वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिकता आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळे कर्करोग हा आता असाध्य रोग राहिलेला नाही, पण तरीही त्याचा उपचार करणे सर्वसामान्यांसाठी अत्यंत अवघड आहे. जगभरातील कर्करोगाच्या वाढत्या धोक्याबद्दल लोकांना जागरूक आणि शिक्षित करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन (World Cancer Day) साजरा केला जातो. कर्करोगाचे अनेक प्रकार असू शकतात, त्याचा धोका सर्व वयोगटातील लोकांना दिसून येत आहे. लक्षणे लवकर ओळखणे आणि उपचार घेणे कर्करोगामुळे मृत्यूचे धोके कमी करण्यात मदत करू शकते.

कर्करोग आणि त्याचे प्रकार

कर्करोग हे जगभरातील मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आहे. शरीराच्या कोणत्याही भागात असामान्य पेशींची वाढ आणि त्याचे अनियंत्रित विभाजन हे कर्करोगाचे कारण असू शकते. आनुवंशिकता, वातावरण, जीवनशैलीतील गडबड, रसायनांचा अतिरेक यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. गर्भाशयाच्या मुखाचा आणि स्तनाच्या कर्करोगाचा धोका महिलांमध्ये सर्वाधिक असतो, तर पुरुषांमध्ये फुफ्फुस, प्रोस्टेट आणि कोलन कर्करोगाचा धोका सर्वाधिक असतो.

कर्करोगाची लक्षणे ओळखा

कर्करोगाची लक्षणे शरीराच्या कोणत्या भागात विकसित होत आहेत यावर अवलंबून असतात. मुख्यतः कर्करोगामुळे: थकवा, अचानक वजन कमी होणे, त्वचेतील बदल जसे की त्वचा पिवळी किंवा काळी पडणे, गिळण्यास त्रास होणे, अस्पष्ट रक्तस्त्राव समस्या ही कर्करोगाची लक्षणे असू शकतात. तुम्हाला तुमच्या शरीरात कुठेही असामान्य गाठ जाणवत असेल, तर वेळेत तपासणी करून घ्या.

हे सुद्धा वाचा

अशा लोकांमध्ये कर्करोगाचा धोका जास्त असतो

पेशींमधील डीएनएमधील उत्परिवर्तनामुळे कर्करोग होतो आणि त्याला अनेक घटक कारणीभूत असू शकतात. धुम्रपान, मद्यपान, जास्त सूर्यप्रकाश, लठ्ठपणा आणि असुरक्षित लैंगिक संबंध यासारख्या काही अस्वास्थ्यकर जीवनशैलीच्या सवयी कर्करोगाचा धोका वाढवू शकतात. आनुवंशिकता देखील कर्करोगाच्या जोखमीच्या प्रमुख घटकांपैकी एक आहे. ज्या लोकांच्या कुटुंबात आधीच कर्करोग आहे त्यांना कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.