World Egg Day 2022: जागतिक अंडी दिन, पहिले अंडे की पहले कोंबडी? याचं कोडं अखेर सुटलं

जेव्हा केव्हा एखाद्या कठीण प्रश्नाचा मुद्दा निघतो तेव्हा, अंडे पहिले आले की कोंबडी हा प्रश्न कायमच कुतूहल निर्माण करतो. मात्र आता याचे उत्तर सापडले आहे.

World Egg Day 2022: जागतिक अंडी दिन, पहिले अंडे की पहले कोंबडी? याचं कोडं अखेर सुटलं
जागतिक अंडी दिन Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 14, 2022 | 6:56 PM

मुंबई,  जगभरातील बहुतेक लोक स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी त्यांच्या आहारात प्रोटीन सप्लिमेंट वाढवतात. प्रथिनांच्या संदर्भात सर्वात स्वस्त आणि पौष्टिक खाद्यपदार्थांबद्दल बोलायचे झाल्यास अंडी प्रमुख स्रोत आहे. प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी जगभरात अंडी मोठ्या प्रमाणात वापरली जातात. अंडी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे (Benefits Of Egg)  आहेत. अंडी उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि संतुलित आहाराचा भाग म्हणून अंड्यांचा वापर वाढवण्यासाठी आणि लोकप्रिय करण्यासाठी, दरवर्षी ऑक्टोबर महिन्याचा दुसरा शुक्रवार जागतिक अंडी दिन (World Egg Day 2022) म्हणून साजरा केला जातो.

वास्तविक, जगभरात अंड्यांबाबत मांसाहार आणि शाकाहार असा संभ्रम आहे. जिथे त्याचा वापर करणारे काही लोक त्याला शाकाहारी मानतात. त्याचबरोबर काहींनी तो मांसाहारात मोडत असल्याचे सांगितले. आरोग्यदायी जीवनासाठी अंडी खाण्याबाबत जनजागृती आणि सेवन करण्यासाठी आज जागतिक अंडी दिन साजरा केला जात आहे.

जगात प्रथमच 1996 मध्ये आंतरराष्ट्रीय अंडी आयोगाच्या व्हिएन्ना परिषदेत जागतिक अंडी दिन साजरा करण्याचे सांगण्यात आले. तेव्हापासून तो साजरा केला जात आहे. जागतिक अंडी दिन साजरा करण्यासाठी लोक आज अंड्यापासून बनवलेला पदार्थ खातात.

हे सुद्धा वाचा

पहिले कोण आले अंडे की कोंबडी?

बऱ्याच काळापासून कोंबडी आणि अंड्याच्या उत्पत्तीवर संशोधन करत असलेल्या यूकेच्या शेफिल्ड आणि वारविक युनिव्हर्सिटीच्या एका टीमला याचे उत्तर सापडले आहे. या संशोधन पथकातील डॉ.कॉलिन फ्रीमन सांगतात की, कोंबडी जगात प्रथम आली.

डॉ. कॉलिन फ्रीमन यांच्या म्हणण्यानुसार, अंडी तयार करण्यासाठी ओव्होक्लिडिन (OC-17) नावाचे विशेष प्रोटीन आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. जी गर्भधारणेदरम्यान कोंबडीच्या गर्भाशयात तयार होते. अशा परिस्थितीत अंडी नव्हे तर कोंबडी प्रथम आली हे सिद्ध झाले आहे.

अंडी खाण्याचे फायदे

कोंबडीची अंडी खाणे डोळ्यांसाठी फायदेशीर मानल्या जाते. अंड्याचे सेवन डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. त्याच वेळी, त्यात भरपूर प्रथिने असतात. जे स्वस्त प्रोटीन सप्लिमेंट म्हणून काम करते. याशिवाय अंड्यांमध्ये आढळणारा पिवळा भाग हा नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी असलेल्या काही पदार्थांपैकी एक आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.