World Health Day 2023 : शरीराच्या या 5 जागी दुखणं म्हणजे समजून जा तुम्हाला….
बरेच लोक या दुखण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यावर कोणतेच उपचार घेत नाहीत. पण या आजारांकडे दुर्लक्ष करणे घातक ठरू शकतं.
Health News : ज्येष्ठ लोकांना अनेक प्रकारचे आजार असतात. यामध्ये गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी अशा अनेक आजारांचा ते सामना करत असतात. आता फक्त ज्येष्ठांनाच नाही तर आजची तरूणाई देखील दुखण्याचा सामना करताना दिसत आहे. पण बरेच लोक या दुखण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यावर कोणतेच उपचार घेत नाहीत. पण या आजारांकडे दुर्लक्ष करणे घातक ठरू शकतं. होय हे अगदी खरं आहे. आता ते कसं घातक ठरू शकतं याबाबत आपण जाणून घेऊयात.
7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. या दिवशी आरोग्याबाबत जनजागृती केली जाते. 1950 साली ही मोहीम सुरू झाली. त्यानंतर हा दिवस दरवर्षी संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. या दिवसानिमित्त आज आम्ही तुम्हाला आरोग्याबाबत काही खास गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे.
1. डोकेदुखी आजकाल अपुरी झोप, टेन्शन, डिजीटल गॅझेट्स अतिवापर अशा अनेक कारणांमुळे डोकेदुखीचा त्रास होतो. सध्या डोकेदुखीचा त्रास बहुतेक लोकांना असतोच. पण जर तुम्हाला वारंवार या त्रासातून जावे लागत असेल तर ते मायग्रेनचे लक्षण असू शकते, त्यामुळे या डोकेदुखीकडे दुर्लक्ष करू नका ताबडतोब तपासणी करून घ्या.
2. स्नायू दुखणे सध्याच्या काळात भरपूर लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असते. त्यामुळे अशा लोकांना हे स्नायू दुखीचा त्रास होतो. स्नायू दुखीचं आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे अनेक शहरी घरांमध्ये पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही. यामुळे, स्नायू दुखणे हा त्रास निर्माण होते.
3. छातीत दुखणे काही लोकांना छातीत दुखण्याचा त्रास असतो. पण जेव्हा तुमच्या छातीत दुखत असेल तेव्हाच तुम्ही डॉक्टरांना भेटावे. कारण हा हृदयविकाराचा एक महत्त्वाचा इशारा मानला जातो. तसेच जर तुमच्या शरीराच्या डाव्या बाजूला दुखत असेल आणि तुम्ही याकडे दुर्लक्ष केल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
4. सांधे दुखी बर्याच ज्येष्ठ लोकांना सांधे दुखीचा त्रास असतो. जळजळ आणि सर्दी यासह अनेक कारणांमुळे सांधेदुखी उद्भवू शकते. तसंच आता या समस्येला अनेक तरुण बळी पडत आहेत. तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्यामुळे हा त्रास निर्माण होऊ शकतो.
5. पोटदुखी पोटदुखीचा त्रास भरपूर लोकांना असतोच. तसेच आपण पोटदुखी ही पचनसंस्थेशी संबंधित समस्या मानतो. पण ती समस्या मूत्रमार्गात संसर्ग, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल डिसऑर्डर किंवा प्रजनन प्रणालीची समस्या असू शकते. त्यामुळे वेळीच डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो उपचार घ्या.