World Heart Day 2022: हार्ट फेल होण्याआधी मिळतात हे संकेत, चुकूनही करू नये दुर्लक्ष
अलीकडे हार्ट फेल होण्याचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले आहे. तिशीच्या आत देखील हृदय विकाराचा झटका येत असल्याने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करणे चुकीचे ठरत आहे.
मुंबई, 29 सप्टेंबर रोजी जगभरात जागतिक हृदय दिन (World Heart Day 2022) साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचे कारण म्हणजे लोकांना हृदयविकारांबाबत (heart failure) जागरूक करणे आहे. तुम्हा सर्वांना माहीतच आहे की, आजच्या काळात हृदयविकाराच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. हृदयविकाराच्या झटक्यामुळे अनेक प्रसिद्ध लोकंही काळच्या काळाच्या पद्याआड गेले. एका अहवालानुसार, 2019 मध्ये हृदयाशी संबंधित आजारामुळे जगभरात 179 दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला. 80 टक्क्यांहून अधिक मृत्यू केवळ हृदयविकाराचा झटका आणि हार्ट फेलमुळे झाले आहेत. यामागचे कारण म्हणजे हल्ली प्रत्येकाची जीवनशैली पूर्णपणे बिघडली आहे. एखादी व्यक्ती हृदय रोगाच्या उंबरठ्यावर अतिशय कमी वेळात पोहोचते. तुमचे हृदयात जर काही समस्या असेल तर ते तुम्हाला अनेक संकेत देते. हार्ट फेल्युअर होण्यापूर्वी त्या व्यक्तीच्या शरीरात अनेक लक्षणे दिसतात, (heart failure Symptoms) ज्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. आज जागतिक हृदय दिनानिमित्त आपण या लक्षणांबद्दल जाणून घेऊया वेळेआधी बचाव करणे सोपे होईल.
हृदयविकाराच्या आधी जाणवतात ही लक्षणे
- अस्वस्थ वाटणे- अनेक वेळा लोकांना अचानक अस्वस्थ वाटू लागते पण ते सामान्य बाब म्हणून दुर्लक्ष करतात, पण जर तुम्हाला रात्री किंवा सकाळी अस्वस्थ वाटू लागले तर हे काळजी करण्याचे कारण आहे. अशावेळी ताबडतोब डॉक्टरांकडे जा.
- छातीत दुखणे- छातीत दुखणे हे हृदयविकाराच्या झटक्याचे सर्वात मोठे लक्षण आहे. त्यामुळे छातीत दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका. जर तुम्हाला छातीवर जडपणा, घट्टपणा आणि दाब जाणवत असेल तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि वेळेत उपचार करा.
- अंगभर अचानक घाम येणे- वातावरणात उष्णता नसतानाही तुमचे शरीर घामाने घामाने भिजत असेल तर सावध व्हा. सकाळी आणि रात्री थंड घाम येणे हे हार्ट फेल होण्याचे लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत लवकरात लवकर डॉक्टरांकडे जा, जेणेकरून तुमचा उपचार वेळेत सुरू होईल.
- अत्यंत थकवा किंवा श्वास लागणे- थकल्यासारखे वाटण्याचे कारण म्हणून आपण अधिक काम गृहीत धरतो, परंतु कधीकधी ते आपल्या हृदयाचे संकेत देखील असते. वास्तविक, जेव्हा हृदयाच्या कोणत्याही नळीमध्ये संसर्ग किंवा जळजळ होते, तेव्हा शरीराला थकवा जाणवू लागतो. हे कमकुवत हृदयाचे लक्षण आहे. दुसरीकडे, कोणतीही शारीरिक हालचाल केल्यानंतर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्याकडेही दुर्लक्ष करू नका. श्वास लागणे हा हृदयविकाराचा सर्वात मोठा इशारा आहे. त्यामुळे तुमच्या हृदयातील स्थिती आणि लक्षणे वेळीच समजून घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.