World Laughter Day 2022 : जागतिक हास्य दिवस : मस्त हसा आणि स्वस्थ जगा!; जाणून घ्या हसण्यात दडलेले दीर्घायुष्याचे रहस्य

हसणे केवळ तुमचा चेहरा सुंदर बनवत नाही तर तुम्हाला मनोमन आनंदी बनवते. तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवण्याची क्षमता हास्यामध्ये आहे. जर तुम्हाला झोपेचा त्रास होत असेल तर रोज रात्री कोणत्या ना कोणत्या मार्गाने हसावे. यामुळे तुमच्या मेंदूतील आवश्यक हार्मोन्स बाहेर पडतात.

World Laughter Day 2022 : जागतिक हास्य दिवस : मस्त हसा आणि स्वस्थ जगा!; जाणून घ्या हसण्यात दडलेले दीर्घायुष्याचे रहस्य
मस्त हसा आणि स्वस्थ जगा!Image Credit source: Google
Follow us
| Updated on: May 01, 2022 | 7:00 AM

मुंबई : आज 1 मे. संपूर्ण जगभरात हा दिवस ‘जागतिक हास्य दिवस‘ (World Laughter Day) म्हणून साजरा केला जातोय. जीवनात हास्य नसते तर…. जगण्याला किंमतच उरली नसती, जगण्याला रसच उरला नसता, जगण्याला कारण राहिले नसते. थोडक्यात काय तर हास्य आहे म्हणून जगणे आहे. हास्य हीच जगण्याची एनर्जी (Energy) असते. याच एनर्जीच्या जीवावर माणूस आपले जगणे प्रसन्न बनवतो, प्रफुल्लित बनवतो. या हास्याची ताकद ओळखूनच जगभरात अनेक स्वयंसेवी संस्था हास्यावर आधारित बरेच उपक्रम राबवतात. इतकेच काय, घराघरात असलेल्या टीव्हींवर देखील हास्याचेच कार्यक्रम भरपूर लोकप्रियता कमावतात. दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी ‘जागतिक हास्य दिवस’ साजरा केला जातो. यंदा हा दिवस 1 मे रोजी साजरा होत आहे. हसल्याने आपला मूड झटपट सुधारतो. हसण्याचे शारीरिक, भावनिक आणि सामाजिक फायदे आपण समजून घेतले पाहिजेत. (World Laughter Day 2021: significance, history and Importance of World Laughter Day in marathi)

1998 मध्ये मुंबईत झाली होती ‘जागतिक हास्य दिवसा’ची सुरुवात

जागतिक हास्य दिन 2022 साजरा करण्याची सुरुवात डॉक्टर मदन कटारिया यांनी 10 मे 1998 रोजी मुंबईत केली होती. या खास दिवसाद्वारे लोकांना हसण्याचे फायदे आणि आनंदाचा उद्देश जाणून घ्यायचा होता. डॉक्टरांच्या मते, हसणे हा एक उत्तम व्यायाम आहे. दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्याचे रहस्य हसण्यातच दडलेले आहे. खरेतर, हास्य हे सर्व वयोगटातील लोकांसाठी एक प्रभावी औषध आहे, प्रत्येकाला समजेल अशी भाषा आहे. मनापासून मोकळेपणाने हसल्याने शरीराची प्रतिकारशक्तीही मजबूत होते. आजच्या धकाधकीच्या जीवनात आणि अनियमित जीवनशैलीत हसणे खूप महत्त्वाचे आहे. हसण्यामुळे आपल्या शरीरातील कॉर्टिसोलची पातळी वाढते. त्यामुळे तणाव कमी होतो. आयुष्यात हसणे खूप महत्वाचे आहे.

हसण्याने माणसांतील अंतर कमी होते!

डॉ. मदन कटारिया यांनी परस्पर तणाव कमी करण्यासाठी या खास दिवसाची सुरुवात केली होती. सामाजिक वैमनस्य दूर करा अर्थात एकमेकांबद्दलची द्वेषाची भावना संपवा. हसण्याने माणसांतील अंतर कमी होते. हा विशेष दिवस साजरा करण्यामागचा हेतू हा आहे की हास्य आपोआप लोकांना स्वतःकडे आकर्षित करते. चेहऱ्यावर हास्य असेल तर कुणाला आकर्षित करण्यासाठी कोणत्याही भाषेची गरज नाही. जेव्हा आपण मित्रांसोबत असतो, तेव्हा आपण दररोजच्या तुलनेत 30 पट जास्त हसतो, हे सत्य आहे. जेव्हाही तुम्हाला हसता येईल तेव्हा जरूर हसा. हसणे हे नक्कीच एक स्वस्त पण प्रभावी औषध आहे, असे डॉ. कटारिया यांचे मत आहे.

हे सुद्धा वाचा

हसणे केवळ चेहरा नव्हे तर संपूर्ण अंतरंग प्रफुल्लित करते!

हसणे केवळ तुमचा चेहरा सुंदर बनवत नाही तर तुम्हाला मनोमन आनंदी बनवते. तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवण्याची क्षमता हास्यामध्ये आहे. जर तुम्हाला झोपेचा त्रास होत असेल तर रोज रात्री कोणत्या ना कोणत्या मार्गाने हसावे. यामुळे तुमच्या मेंदूतील आवश्यक हार्मोन्स बाहेर पडतात. मेलाटोनिन नावाचा हा संप्रेरक तुम्हाला झोप आणण्यास मदत करतो. तो हसण्याने मेंदूमध्ये उत्सर्जित होतो, असे जाणकारांनी म्हटले आहे. तुमच्या चेहऱ्यावरचे हास्य हे देवाची सही आहे, ते तुमच्या अश्रूंनी वाहू देऊ नका किंवा रागाने पुसू नका, असे म्हटले जाते, ते उगाच नव्हे. (World Laughter Day 2021: significance, history and Importance of World Laughter Day in marathi)

मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर.
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग.
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही.
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.