World Parkinson’s Day | ज्येष्ठांमध्ये आढळणाऱ्या पार्किन्सनचा तरुणाईलाही विळखा, कंपवाताच्या रुग्णांनी काय घ्यावी काळजी?
जागतिक पार्किन्सन दिनाच्या निमित्ताने 'ऑनलाइन वेबिनार'द्वारे पार्किन्सन्सच्या पेशंट्स पर्यंत पोहचण्यासाठी पी.डी.एम.डी.एस ने विशेष प्रयत्न केले व ह्या आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी PDMDS कार्यशील आहे.
मुंबई : 11 एप्रिल हा जागतिक पार्किन्सन दिन (World Parkinson’s Day) म्हणून जगभर साजरा केला जातो. पार्किन्सन्स डिसीज म्हणजेच कंपवात- मेंदूच्या पेशींचा ऱ्हास आणि मेंदूतील डोपामाईन केमिकलची मात्रा कमी झाल्याने होणारा आणि एक वाढत जाणारा हा आजार आहे. ज्यामुळे व्यक्तीच्या हालचाली, बोलणं, स्मृती, इत्यादी. वर परिणाम दिसून येतो! प्रामुख्याने 60 वर्षावरील व्यक्तीमध्ये हा आजार जास्त प्रमाणात दिसत असला तरी तरुण व्यक्तीमध्ये सुद्धा ह्याचे प्रमाण वाढत आहे, ज्याला ‘यंग ओनसेट पार्किन्सन्स डिसीज’ असे म्हणतात. ‘पार्किन्सन्स डिसीज अँड मूव्हमेंट डिसॉर्डर सोसायटी (PDMDS)’ ही संस्था बॉम्बे हॉस्पिटलमधील प्रसिद्ध न्यूरोलोजिस्ट डॉ. भिम सिंघल यांनी 2001 साली स्थापन केली आणि ह्या संस्थेची भारतभरात 13 राज्यात एकूण 64 केंद्रे आहेत. त्याचबरोबर कोव्हिडच्या काळात भारतातील सर्व राज्यातील रुग्ण ऑनलाईन सेवांचा लाभ घेत आहेत. PDMDS मार्फत कंपवाताच्या रुग्णांना मोफत शारीरिक, मानसिक, वाचा इ. उपचार तज्ञांकडून दिले जातात.
जागतिक पार्किन्सन दिनाच्या निमित्ताने ‘ऑनलाइन वेबिनार’द्वारे पार्किन्सन्सच्या पेशंट्स पर्यंत पोहचण्यासाठी पी.डी.एम.डी.एस ने विशेष प्रयत्न केले व ह्या आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी PDMDS कार्यशील आहे. यावर्षी भारत सरकार द्वारा वैद्यकीय क्षेत्रात विशेष कामगिरी बद्दल डॉ. भीम सिंघल यांना ‘पद्मश्री’ ह्या बहुमानाने सन्मानित करण्यात आले आहे. ह्या निमित्ताने त्यांची विशेष मुलाखत ह्या कार्यक्रमात घेण्यात आली.
पार्किंसन्सचे सदस्य व त्यांचे देखभालकर्ते यांनी कार्यक्रमात सहभागी होऊन विशेष मनोरंजन कार्यक्रमाने ह्या समारंभाची शोभा द्विगुणित केली. तसेच डॉ. भिम सिंघल, डॉ. पंकज आगरवाल, डॉ. चारुलता सांखला, डॉ. पेटरस्प वाडिया, डॉ. जिम्मी लालकाका, डॉ. कठपाल यांसारख्या भारतातील विख्यात न्युरोलॉजिस्ट तसेच डॉ. उर्वशी शहा, डॉ. मरिया बरेटो, डॉ. राजवी मेहता यांसारख्या पार्किन्सन्स विषयक तज्ञांनी या कार्यक्रमात चर्चासत्र घेतले आणि पार्किंसन्सची लक्षणे, उपचार, योगा, शस्त्रक्रिया अशा अनेक विषयांवर तंद्यांनी मार्गदर्शन केले आणि रूग्णांबरोबर संवाद साधत त्यांच्या शंकांचे निरसन केले. हा कार्यक्रम बघण्यासाठी युट्युब संकेतस्थळावर जाऊ शकता
पार्किन्सन्सच्या लक्षणांचे योग्य प्रकारे नियोजन करण्यासाठी व ह्या आजारास नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधोपचार, फिजिओथेरपी, वाचा उपचार, समुपदेशन, डान्स आणि संगीतोपचार, सक्रिय जीवनशैली असे बहुआयामी व्यवस्थापन आवश्यक असते.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा: 9987216057 संकेतस्थळ: www.parkinsonssocietyindia.com ईमेल: pdmds.india@gmail.com
संबंधित बातम्या :
World Parkinson’s Day : जागतिक पार्किन्सन्स दिन म्हणजे काय ? जाणून घ्या एका क्लिकवर