आठ आठवड्यांच्या बाळाला 16 कोटींचं इंजेक्शन, ‘हा’ आहे जगातील सर्वात महाग आजार

जेनेटिक स्पायनल मॅस्कुलर अ‍ॅट्रोफी म्हणजेच SMA हा आजार शरीरात एसएमएन-1 जीनच्या कमतरतेमुळे होतो.

आठ आठवड्यांच्या बाळाला 16 कोटींचं इंजेक्शन, 'हा' आहे जगातील सर्वात महाग आजार
Follow us
| Updated on: Dec 16, 2020 | 2:49 PM

मुंबई : ब्रिटनमध्ये एका आठ आठवड्यांच्या बाळाला जगातील सर्वात महाग इंजेक्शन लावण्यात आले आहेत (Worlds Most Expensive Injection And Medicine). आता तुम्ही विचार करत असाल की या चिमुकल्या बाळाला असा कुठला आजार झाला आहे, ज्यासाठी तब्बल 16 कोटी रुपयांचं इंजेक्शन लावण्यात आलं आगे. तर या आजाराचं नाव आहे ‘जेनेटिक स्पायनल मॅस्कुलर अ‍ॅट्रोफी’  (Genetic Spinal Muscular Atrophy)म्हणजेच SMA (Worlds Most Expensive Injection And Medicine).

SMA हा आजार काय आहे?

16 कोटी रुपयांचं इंजेक्शन ऐकून तुम्ही नक्कीच विचार करत असाल की, जगात कर्करोगापेक्षा अधिक धोकादायक, जीवघेणा असा कुठला आजार आहे. ज्याचं औषध इतकं महाग आहे. आपण आज तेच जाणून घेऊ –

जेनेटिक स्पायनल मॅस्कुलर अ‍ॅट्रोफी म्हणजेच SMA हा आजार शरीरात एसएमएन-1 जीनच्या कमतरतेमुळे होतो. यामुळे छातीचे स्नायू कमकुवत होतात आणि श्वास घेण्यात अडथळा येतो. हा आजार जास्तकरुन लहान मुलांना होतो आणि त्रास वाढून रुग्णाचा मृत्यू होतो. ब्रिटनमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात आहे आणि तिथे दरवर्षी जवळपास 60 बाळांना जन्मजात हा आजार होतो.

या आजाराचं इंजेक्शन इतकं महाग का असतं?

ब्रिटनमध्ये अनेक बाळांना या आजाराने ग्रासलं आहे. पण, तिथे याचं औषध तयार होत नाही. या इंजेक्शनचं नाव जोलगेनेस्मा आहे. ब्रिटमध्ये हे इंजक्शन अमेरिका, जर्मनी आणि जापानहून मागवलं जातं. हा आजार असलेल्या रुग्णाला एकदाच हे इंजेक्शन दिलं जातं. हे इंजेक्शन इतकं महाग आहे, कारण जोलगेनेस्मा त्या तीन जीन थेरेपीपैंकी एक आहे ज्या थेरेपीला युरोपात प्रयोग करण्याची परवानगी आहे.

तीन वर्षांपूर्वीपर्यंत या आजाराचं निदान शक्य नव्हते. पण, 2017 मध्ये अनेक अभ्यास आणि चाचण्यांनंतर अखेर डॉक्टरांना यश आलं. त्यानंतर या इंजेक्शनच्या उत्पादनाला सुरुवात करण्यात आली. 2017 मध्ये 15 बाळांना हे औषध देण्यात आले होते. त्यानंतर ही बाळं 20 आठवड्यांपेक्षा जास्त दिवसांपर्यंत ते जगले होते (Worlds Most Expensive Injection And Medicine).

ज्या बाळाला हे 16 कोटीचं इंजेक्शन लावण्यात आलं आहे, त्याचं नाव एडवर्ड आहे. या बाळाच्या पालकांनी या महाग उपचारासाठी क्राऊड फंडिंगच्या मदतीने पैसे जुळवण्याची मोहिम सुरु केली आहे. मोहिमेअंतर्गत त्यांनी आतापर्यंत 1.17 कोटी रुपये मदत म्हणून जुळवले आहे. त्यांच्यामते, पैशांपेक्षा जास्त किंमत त्यांच्या बाळाच्या आयुष्याची आहे.

Worlds Most Expensive Injection And Medicine

संबंधित बातम्या :

कोरोनामुळे उद्भवणारा ‘हा’ सामान्य आजार हिरावून घेईल डोळ्यांची दृष्टी, संशोधकांचा नवा दावा!

बापरे, मलनिस्सारण वाहिन्यांच्या पाण्यात कोरोना विषाणू; पालिका म्हणते, मुंबईकरांना धोका नाही!

COVID-19 Research | अविवाहितांना कोरोनाचा धोका अधिक, रिसर्चमध्ये धक्कादायक दावा

इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार, 1000 रुग्ण आढळल्याने खळबळ

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.