भारतातील ‘या’ सात येाग गुरुंच्या तपश्चर्येचे आहे ‘योगविद्या’ फळ…जगभर पोहचविले ‘योगशिक्षे’ चे महत्व; जाणून घ्या, भारतातील या सात योगगुरूंबाबत संपूर्ण माहिती

आंतरराष्ट्रीय योग दिवस 2022: योगासनाचे फायदे पाहता लोकांनी परदेशातही त्याचा स्वीकार केला आहे. परंतु, तुम्हाला माहिती आहे का, भारतातील ख्यातनाम योगगुरूंनी ही परंपरा समृद्ध करण्यात मोठे योगदान दिले आहे. जाणून घ्या, कोण होते हे सात योगगुरू आणि काय आहे त्यांचे योगदान

भारतातील ‘या’ सात येाग गुरुंच्या तपश्चर्येचे आहे ‘योगविद्या’ फळ…जगभर पोहचविले ‘योगशिक्षे’ चे महत्व; जाणून घ्या, भारतातील या सात योगगुरूंबाबत संपूर्ण माहिती
Image Credit source: wallpaperflare.com
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 5:04 PM

निरोगी जीवन आणि निरोगी शरीरासाठी योग खूप महत्वाचा आहे. लोकांना योगाची जाणीव करून देण्यासाठी दरवर्षी 21 जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा केला जातो. योगाचे फायदे पाहून परदेशातही लोकांनी त्याचा स्वीकार केला आहे. परंतु, आपल्याला हे माहिती हवे की, काही प्रसिद्ध योगगुरूंनी (By famous yoga gurus) भारतातील योग परंपरा समृद्ध करण्यात मोठे योगदान दिले आहे. भारतातील असे सात योगगुरूं आहेत, ज्यांच्या तपश्चर्येने आणि कठोर परिश्रमाने योगाचा विस्तार (Expansion of yoga) तर झालाच, पण भारताला योगगुरू म्हणून ओळखही मिळाली.यातील पहिले योगगुरू आहेत, म्हणजे, धीरेंद्र ब्रह्मचारी हे गुरू इंदिरा गांधींचे योग शिक्षक म्हणून ओळखले जात. त्यांनी दूरदर्शन वाहिनीच्या माध्यमातून योगाचा प्रसार (The spread of yoga) करण्याचे काम सुरू केले. यासोबतच त्यांनी दिल्लीच्या शाळांमध्ये योगासने आणि विश्वयतन योगाश्रमात योगासने सुरू केली. त्यांनी हिंदी आणि इंग्रजी भाषेत अनेक पुस्तके लिहून योगाचा प्रचार केला आहे. त्याचा जम्मूमध्ये मोठे आश्रमही आहे.

बी. के. एस. अय्यंगारः

बीकेएस अय्यंगार यांनी योगाला जगभरात मान्यता मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांची ‘अयंगार योग’ नावाची योगशाळाही आहे. या शाळेच्या माध्यमातून त्यांनी जगभरातील लोकांना योगाची जाणीव करून दिली. 2004 मध्ये, टाईम्स मासिकाने त्यांना जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून नाव दिले. याशिवाय त्यांनी पतंजलीच्या योगसूत्रांची नव्याने व्याख्या केली. योग बायबल मानले जाणारे ‘लाइट ऑन योग’ नावाचे पुस्तक देखील त्यांच्या नावी आहे.

कृष्ण पट्टाभि जोईसः

कृष्ण पट्टाभि जोईस हे देखील एक महान योगगुरू होते. त्यांचा जन्म 26 जुलै 1915 रोजी झाला आणि 18 मे 2009 रोजी त्यांचे निधन झाले. कृष्णाने अष्टांग विन्यास योग शैली विकसित केली. त्याच्या अनुयायांमध्ये मॅडोना, स्टिंग आणि ग्वेनेथ पॅल्ट्रो सारख्या मोठ्या नावांचा समावेश होता.

हे सुद्धा वाचा

तिरुमलाई कृष्णमाचार्यः

तिरुमलाई कृष्णमाचार्य यांना ‘आधुनिक योगाचे जनक’ म्हटले जाते. हटयोग आणि विन्यास पुनरुज्जीवित करण्याचे सर्व श्रेय त्यांना जाते. तिरुमलाई कृष्णमाचार्य यांनाही आयुर्वेदाची जाण होती. त्यांच्याकडे उपचारासाठी येणाऱ्या लोकांना ते योग आणि आयुर्वेदाच्या मदतीने बरे करायचे. त्यांनी म्हैसूरच्या महाराजांच्या कारकिर्दीत भारतभर योगाला नवी ओळख दिली होती.

परमहंस योगानंदः

परमहंस योगानंद हे त्यांच्या ‘ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी’ या पुस्तकासाठी ओळखले जातात. त्यांनी पाश्चिमात्य लोकांना ध्यान आणि क्रिया योगाची ओळख करून दिली. एवढेच नाही तर परमहंस योगानंद हे योगाचे पहिले आणि मुख्य शिक्षक आहेत. त्यांनी आयुष्याचा बराचसा काळ अमेरिकेत व्यतीत केला.

स्वामी शिवानंद सरस्वतीः

व्यवसायाने डॉक्टर असलेले स्वामी शिवानंद सरस्वती यांनी योग, वेदांत आणि इतर अनेक विषयांवर 200 हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे ‘शिवानंद योग वेदांत’ नावाचे योग केंद्र आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य या केंद्रासाठी वाहून घेतले. कर्म आणि भक्ती यांना योगाशी जोडून त्यांनी योगाचा जगभर प्रचार केला.

महर्षि महेश योगीः

महर्षि महेश योगी हे देश आणि जगामध्ये ‘अतिरिक्त ध्यानाचे’ एक प्रसिद्ध गुरू होते. अनेक सेलिब्रिटीही त्यांना आपला गुरू मानतात. ते, त्यांच्या योगासाठी जगभर ओळखले जातात. श्री श्री रविशंकर हे देखील महर्षी महेश योगी यांचे शिष्य आहेत. जगभरात योगविदया पोहचविणाऱया या योगगुरूबाबत सविस्तर वृत्त आजतक हिंदीने प्रसारीत केले आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.