Food For Eyesight : या पदार्थांच्या सेवनाने सुधारेल तुमची दृष्टी, आजच करा आहारात समावेश

सध्या बरेच जण स्क्रीनवर जास्त वेळ घालवतात. पण त्यामुळे फक्त मानसिक आणि शारीरिक नव्हे तर इतर समस्यांचाही सामना करावा लागतो. दृष्टी धूसर होणे, हा त्रासही लोकांना सहन करावा लागतो.

Food For Eyesight : या पदार्थांच्या सेवनाने सुधारेल तुमची दृष्टी, आजच करा आहारात समावेश
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Jul 08, 2023 | 6:46 PM

Food For Eyesight : आपली झपाट्याने बदलणारी जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर सतत परिणाम होत असतो. आजकाल लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्ती ही बराच वेळ मोबाईल-लॅपटॉपवर घालवत असते. अशा स्थितीत सतत स्क्रीनसमोर (screen time) बसल्यामुळे आपली नजर कमजोर होत असते. स्क्रीनच्या अतिवापरामुळे तुमचे डोळेही (eye broblem) कमकुवत झाले असतील तर खाली दिलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. त्यांचे सेवन दृष्टी सुधारण्यासाठी (vision) फायदेशीर ठरू शकते.

गाजर

गाजर हे बीटा-कॅरोटीनचा चांगला स्रोत आहे, ज्याचे शरीर व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित करते. चांगल्या दृष्टीसाठी, विशेषतः रात्री नीट दिसावे यासाठी व्हिटॅमिन ए आवश्यक असते. गाजराच्या सेवनाचा बराच फायदा होतो.

रताळं

रताळं हे देखील बीटा-कॅरोटीनचा आणखी एक उत्तम स्रोत आहे. त्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक देखील असते. त्यातील अनेक गुणधर्मांमुळे डोळ्यांचे नुकसान होण्यापासून संरक्षण होते.

पालक

पालकामध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन मोठ्या प्रमाणात असते. हे अँटिऑक्सिडंट्स मॅक्युलाचे संरक्षण करण्यास मदत करतात. मॅक्युला हा डोळ्याचा एक असा भाग आहे जो सेंट्रल व्हिजनसाठी किंवा दृष्टीसाठी जबाबदार असतो.

केल

केलमध्येही ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन असते. तसेच त्यामध्ये व्हिटॅमिन सी व के मुबलक प्रमाणात असते. हे दोन्ही घटक डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी महत्वाचे असते.

सॅल्मन

सॅल्मन मासा हा ओमेगा-3 फैटी ॲसिडचा उत्तम स्त्रोत आहे, जे डोळ्यांच्या स्वास्थासाठी आवश्यक असते. ओमेगा-3 फैटी हे सूज कमी करण्यासाठी व डोळ्यांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यासाठी महत्वाची भूमिका निभावते.

अंडी

अंडी हे ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन तसेच व्हिटॅमिन ए चा चांगला स्रोत आहेत. त्यात बरीच प्रथिनेही असतात. त्यांच्या सेवनाने डोळ्यांना फायदा होतो. प्रथिनांचे एक चांगले स्त्रोत देखील आहेत, जे आपल्या अश्रूंच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहे.

संत्रं

मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी असलेल्या संत्र्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. त्यामुळे डोळ्यांचे होणारे नुकसान भरून निघते. याशिवाय, हे पोटॅशियमचा एक चांगला स्रोत आहे, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

बेरीज

बेरीज या व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि अँथोसायनिन्ससह अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहेत. अँथोसायनिन्स या रंगद्रव्यांमुळे बेरींना त्यांचे लाल, निळे आणि जांभळे रंग मिळतात. तसेच त्यामुळे डोळ्यांचे नुकसान होण्यापासून संरक्षण होण्यास मदतही होते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.