खाऊन- पिऊन करा वजन कमी, तुमच्या फ्रीजमध्ये द्या ‘या’ पदार्थांना जागा..

वजन कमी करायचे म्हटले की हेल्दी फूड खायची सवय अंगिकारणे हे सर्वात आव्हानात्मक वाटते. काही अशा हेल्दी पदार्थांबद्दल जाणून घेऊया, जे तुम्ही नेहमी फ्रीजमध्ये ठेऊ शकता आणि मजेत खाऊन-पिऊन वजन कमी करू शकता.

खाऊन- पिऊन करा वजन कमी, तुमच्या फ्रीजमध्ये द्या 'या' पदार्थांना जागा..
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 11:27 AM

नवी दिल्ली – वाढत्या वजनावर नियंत्रण (control on weight) ठेवण्यासाठी निरोगी आहाराचे सेवन करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे, परंतु प्रत्येकासाठीच याचे पालन करणे फार सोपे नाही. असे बरेच लोक असतात, ज्यांच्यासाठी अन्न हेच जीवन असते आणि त्यामुळेच हेल्दी पदार्थ (healthy food) खाणे किंवा डाएटचे पालन करणे अशक्य ठरते. अशा लोकांसाठी वजन कमी करणे (weight loss)हे आव्हानात्मक काम असते. जर तुम्हीही फूडी असाल आणि अशाच समस्यांचा सामना करत असाल तर हे नक्की वाचा.

आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, झटपट वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या फ्रिजमध्ये नेहमी हेल्दी पदार्थ ठेवलेत तर तुम्हाला वजन कमी करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. जेव्हा तुम्हाला काही खायची इच्छा होते, तेव्हा फ्रीज उघडल्यावर जर तुम्हाला ताजी फळं, भाज्या आणि हेल्दी पदार्थ दिसले तर तुम्ही काही हेल्दी जेवण बनवू शकता. फ्रीजमध्ये तुम्ही कोणते (हेल्दी) पदार्थ ठेवू शकता, हे जाणून घेऊया.

अंडी

हे सुद्धा वाचा

संशोधनात असे आढळून आले आहे की पौष्टिक पदार्थांनी युक्त असलेली अंडी ही वजन कमी करण्यास मदत करतात. एवढेच नाही तर तुम्ही अंड्याचे विविध प्रकारचे हेल्दी स्नॅक्स बनवून तुमचे पोट भरू शकता.

भाजी

वजन कमी करण्यासही भाज्या खूप मदत करतात. फायबर आणि अँटी-ऑक्सिडंटने समृद्ध असलेल्या या भाज्या तुम्ही अंड्यांच्या पदार्थांसह साइड डिश म्हणून खाऊ शकता. एक चांगले, चविष्ट सॅलॅड बनवून तुम्ही खाऊ शकता.

हंगामी फळं

पुढच्या वेळी जर तुम्हाला गोड खाण्याची इच्छा असेल तर फ्रीजमध्ये चॉकलेट, कँडी किंवा केकऐवजी ठेवण्याऐवजी हंगामी फळे ठेऊ शकता. वजन कमी करण्यासाठी ते खूप प्रभावी ठरते आणि हे संशोधनात देखील सिद्ध झाले आहे.

सॅलॅड ड्रेसिंग

जर तुम्ही फ्रिजमध्ये विविध प्रकारचे चांगल्या दर्जाचे सॅलॅड ड्रेसिंग ठेवले तर तुमची चविष्ट आणि पौष्टिक सॅलॅड्स खाण्याची इच्छा सहज पूर्ण होईल. फक्त ही प्रॉडक्ट्स फॅट आणि कॅलरी फ्री असतील याची काळजी घ्या. अन्यथा तुम्ही फ्रिजमध्ये होममेड सॅलॅड ड्रेसिंगचा देखील वापरू शकता.

हाय प्रोटीन स्नॅक्स

हाय प्रोटीन फूड तुमचे वजन नियंत्रित ठेवण्याचे काम करते. यासाठी तुम्ही तुमच्या फ्रीजमध्ये कॉटेज चीज, दही इत्यादी ठेवू शकता. हे पदार्थ केवळ चविष्ट नसतात तर तुमचे वजन नियंत्रित ठेवण्याचे कामही करतात.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.