मूळव्याधामुळे उडाली रात्रीची झोप ? किचनमधील हा पदार्थ वापरल्याने मिळू शकतो आराम

मूळव्याधाच्या त्रासामध्ये हळद अतिशय गुणकारी मानली जाते. त्यामध्ये असलेले करक्यूमिन हे फायदेशीर ठरते.

मूळव्याधामुळे उडाली रात्रीची झोप ? किचनमधील हा पदार्थ वापरल्याने मिळू शकतो आराम
Follow us
| Updated on: Aug 14, 2023 | 2:27 PM

Home Remedies For Piles : पाइल्स अर्थात मूळव्याध (piles) ही अतिशय कठीण , गुंतागुंतीची समस्या आहे. खराब पचनतंत्रामुळे आजकाल बऱ्याच जणांना पाइल्सचा त्रास होत असतो. या समस्येमध्ये मलत्याग करण्याच्या मार्गात सूज येते व मलत्याग करणे कठीण होते. काही वेळा रक्तही येते. यामुळे अनेक वेळा लोकांना अस्वस्थ वाटते, उठण्या-बसण्याचाही प्रॉब्लेम (piles problem) येतो. वेळीच त्यावर उपाय केले नाही तर काही वेळेस ऑपरेशनची नामुष्कीही ओढवू शकते. मात्र काही घरगुती उपायांच्या मदतीने मूळव्याधाच्या सुरूवातीच्या काळात आराम मिळू शकतो.

मूळव्याधात करा हळदीचा वापर

हळद ही आपल्या स्वयंपाकघरातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. औषधी गुणांनी युक्त असलेली हळद ही आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी प्राचीन काळापासून वापरली जाते. तसेच त्वचेसाठी सौंदर्य प्रसाधन म्हणूनही त्याचा उपयोग होतो. हळदीमध्ये असलेले करक्यूमिन हे तत्व फायदेशीर असते. त्यामुळे ती मूळव्याधात खूपच उपयोग ठरते. तसेच ती अँटीसेप्टिक, अँटीव्हायरल, अँटीऑक्सिडंट, अँटीकार्सिनोजेनिक आणि प्रतिजैविक गुणधर्मांनी समृद्ध आहे. हळदीच्या वापराने मूळव्याधामुळे होणाऱ्या त्रासापासून आराम मिळू शकतो. ते कसे हे जाणून घेऊया…

कसा करावा हळदीचा वापर

  1. मूळव्याधात हळद आणि खोबरेल तेल एकत्र मिसळून वापरू शकता. हळदीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. यामुळे दुखण्यापासूनही आराम मिळू शकतो. हळद आणि खोबरेल तेलाचे मिश्रण कापसाच्या साहाय्याने बाहेरील मूळव्याधावर लावा. यामुळे दिलासा मिळू शकतो.
  2. हळद आणि कांद्याचा रस लावल्यानेही फायदा मिळू शकतो. एक कांदा किसून त्याचा रस काढा, त्यामध्ये त्यात मोहरीचे तेल आणि हळद घाला आणि आता ही पेस्ट मूळव्याध झालेल्या भागावर लावा आणि 30 मिनिटे राहू द्या. याने आराम मिळू शकतो.
  3. कोरफडीचा रस आणि हळद यांचे मिश्रण लावणेही मूळव्याधाच्या दुखण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कोरफडीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे जळजळ कमी करतात.
  4. मोहरीच्या तेलात हळद मिसळून प्रभावित भागावर लावल्यास रक्तस्त्राव थांबण्यास मदत होते. सूज देखील कमी होऊ शकते. वेदनाही दूर होऊ शकतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.