Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युट्युबर म्हणाला दिवसाचे १६ चमचे तूप खातो, डायटीशियनने सांगितले फायदे आणि तोटे

डिजिटल क्रिएटर प्रशांत देसाई यांनी आपल्या इंस्टाग्रामवरील रिल्समध्ये आपण शुगर स्पाईक आणि मेटाबोलीकली फ्लेक्झीबल रहाण्यासाठी दिवसाचे सोळा चमचे तूप खात असल्याचे म्हटल्याने विविध चर्चा तोंड फूटले आहे. यावर आता डायटीशियनने उत्तर दिले आहे.

युट्युबर म्हणाला दिवसाचे १६ चमचे तूप खातो, डायटीशियनने सांगितले फायदे आणि तोटे
Follow us
| Updated on: Jan 29, 2025 | 5:53 PM

आपले आई- आजोबा तुपाने काही आजार वगैरे होत नाहीत असे सांगत असतात. त्यामुळे जुनी पिढी अजूनही वारेमाप तूपाचे सेवन करीत असते. पराठा, चपाती, गरम भातावर तुपाची धार टाकून आवडीने  तूपाचे सेवन केले जात असे. परंतू आता हेल्थ एक्सपर्टने अशा प्रकारे तुपाचे सेवन आरोग्यासाठी धोकादायक ठरविले आहे. एका डिजिटल क्रिएटरने आपली फॅट कमी होण्यासाठी आपण दररोज सोळा चमचे तूपाचे सेवन करीत असल्याचे इन्स्टाग्राम पोस्टवर म्हटले आहे. अशा प्रकारे तूपाचे सेवन करणे चांगले की वाईट? त्यांचे फायदे किती आणि तोटे कोणते ? याची माहिती डायटिशियनने दिली आहे.

या संदर्भात डिजिटल क्रिएटर आणि हेल्थ एक्सपोर्ट प्रशांत देसाई यांनी आपल्या इंस्टाग्राम वरील रिल्समध्येत चरबीचे ज्वलन होण्यासाठी आणि शुगरवर नियंत्रण मिळविण्यासाठी दररोज १६ चमचे तूप सेवन करीत असल्याचे म्हटले आहे. यावर न्युट्रीशन्स्टी Hetal Chheda यांनी सांगितले आहे की,” ते जर दररोज १६ चमचे तूप खात असतील तर जाणतेपणी किंवा अजाणतेपणी किटो रुटीन पाळत असतील. आणि या दिवसांत हे तूप इंधन म्हणून शरीरात काम करीत असेल.” दिवसांचे सोळा चमचे तूप सेवन करणे शरीरासाठी योग्य आहे की अयोग्य याबाबत त्यांनी माहिती दिली आहे. त्याम्हणाल्या की घी आपल्या शरीरासाठी पोषक असले तरी १६ चमचे घी खाणे हे खूपच जास्त प्रमाण आहे. यातील कॅलरी आणि फॅटचा आपण घी किंवा तूप सेवन करताना नक्कीच विचार केला पाहीजे. तूपात सर्वाधिक चरबी असते. त्याचे सेवन जास्त करणे योग्य नाही.त्यामुळे हृदय विकाराला आमंत्रण मिळू शकते.

तरीही तूप केटो फ्रेंडली फूड आहेत. कारण यातील हाय फॅट कन्टेन्ट आणि लो कार्बोहायर्डेट कन्टेन्टमुळे ते केटो फ्रेंडली फूड आहे. तरी दिवसाचे १६ चमचे तूपाचे सेवन करणे धोकादायक आहे.या जादा प्रमाणामुळे कॅलरीज आणि सॅच्युरेटेड फॅटचे अतिप्रमाण शरीरात जाऊ शकते, ज्यामुळे केटोजेनिक आहाराचे फायदे कमी होऊ शकतात,” असेही त्यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

पोषकत्वाचे भांडार

तूपाचा तुम्ही योग्य प्रमाणात रोजच्या आहारात वापर करू शकता. यात विटामिन्स ए, डी,ई आणि के या पोषकत्वाचे भरपूर असते. यातील फॅटी एसिडमुळे डोळ्यांच्या आरोग्यासह हाडांची मजबूती इतर फायदे होतात. यातील एण्टी इन्फ्लेमेंटरी प्रॉपर्टीमुळे ते दुर्धर हृदय विकार आणि संधीवाताचे आजाराचे प्रमाण कमी करू शकते. आयुर्वेदानुसार तूपाचा वापर आहार केल्याने तुमच्या शरीरातील पचन संस्था चांगली काम करते. तसेच पचनाचा मार्ग चांगला होऊन तुमच्या शरीरात पोषक तत्वे शोषली जातात.

एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा.
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट.
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं.