कोरोना विषाणूबाबत (Corona virus) दररोज नवनवा अभ्यास आणि संशोधन समोर येत आहे. दरम्यान, ज्या वुहानमधून कोरोना विषाणूचा उगम झाला असा दावा केला जातो, तिथल्याच शास्त्रज्ञांनी आता धडकी भरवणारं संशोधन जगासमोर आणलं आहे. वुहानमधील शास्त्रज्ञांनी (Scientist in Wuhan) केलेल्या दाव्यानुसार कोरोना विषाणूचा ‘NeoCov’ म्हणजेच निओकोव्ह हा दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेला प्रकार अत्यंत धोकादायक आणि घातक आहे. चिंताजनक बाब म्हणजे कोरोनाच्या निओकोव्ह या विषाणूचा मृत्यूदर आता डोकेदुखी वाढवणारा असल्यानं संशोधकांनी चिंता व्यक्त केली आहे. फक्त मृत्यूदरच नव्हे तर संसर्गाचा वेगही अत्यंत भयंकर असून यामुळे आता खबरदारी बाळगणं आणि वेळीच धोका ओळखण्याची गरज असल्याचं आणि काळजी घेण्याचं आवाहन संशोधकांनी केलं आहे. रशियातील वृत्तसंस्था स्पुतनिकने (Sputanik) याबाबतचं वृत्त दिलं असून या नव्या संशोधनानं एकच खळबळ उडवली आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनं कहर केलेला असतानाच आता संपूर्ण देश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करतो आहे. पहिल्या दोन्ही लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेनं तुलनेनं कमी नुकसान केलेलं असलं तरिही आता दक्षिण आफ्रिकेतील कोरोना विषाणूचा नवा प्रकार हा अत्यंत घातक आणि डोकेदुखी वाढवणारा असल्याचं सगळ्यांनी धास्ती घेतली आहे.
कोरोनाचा दक्षिण आफ्रिकेत आढळलेला निओकोव्ह हा नवा विषाणू नसून याआधीच त्याचं निदान हे खरंतर झालेलं होतं. मध्य आशियात असलेल्या देशात या विषाणी आढळून आला होतो. MERS-CoV म्हणजेच मार्ससारखा असलेला हा विषाणू 2012 आणि 2015 साली कहर करत होता. त्यानंतर 2020 मध्ये आलेल्या सार्स या नव्या प्रकारानं संपूर्ण जगाला पछाडून सोडलं होतं.
It has been discovered in South Africa and it is reportedly related to the Middle East respiratory syndrome #MERS-COV #NeoCoV #COVID19 pic.twitter.com/n95rlbHJMc
— KRoshan (@kroshan4mobile) January 28, 2022
कोरोना जसा वटवाघुळांमुळे परसला असा दावा केला जातो., तसाच आता ज्या निओकोव्हबाबत भीती व्यक्त केली जाते आहोत, तो ही वटवाघुळांमध्येच आढळला होता. प्राण्यांबाबत अभ्यास करणाऱ्या एका वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, आता निओकोव्ह हा विषाणू माणसांतही पसरु शकतो, असा दावा केला जातो आहे. biroRxiv या वेबसाईटवर याबाबतचा अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे.
वुहानमधील संशोधकांनी केलेल्या दाव्यादुसार तीनपैकी एका व्यक्तीचा निओकोव्हमुळे मृत्यू होण्याची भीती आहे. हा मृत्यूदर चिंता वाढवणारा असल्याचं जाणकारांचं मत असून यामुळे सगळ्यांनी काळजी घेणं आणि वेळीच धोका ओळखणं गरजेचं असल्याचं म्हटलं जातंय. सध्या होत असलेला सार्सचा वेगवान संसर्ग हा भविष्यात निओकोव्हचा धोका वाढवण्याचं एक प्रमुख लक्षण आहे, असाही संशय व्यक्त केला जातोय.
भारतात शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या चोवीस तासांत 2,51,209 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आङे. तर 627 रुग्ण दगावले आहेत. तर 3,47,443 जण बरे झाले आहे. सध्याच्या घडीला देशात 21,05,611 इतके सक्रिय रुग्ण असून भारताचा पॉझिटिव्ही रेट हा 15.88% इतका नोंदवण्यात आला आहे. तर 1,64,44,73,216 इतक्या जणांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.
India reports 2,51,209 new #COVID19 cases, 627 deaths and 3,47,443 recoveries in the last 24 hours
Active case: 21,05,611 (5.18%)
Daily positivity rate: 15.88%Total Vaccination : 1,64,44,73,216 pic.twitter.com/vz7DhaPdvz
— ANI (@ANI) January 28, 2022
गरोदरपणात ‘ही’ लक्षणं आढळल्यास सावधान!, बाळावर होऊ शकतो गंभीर परिणाम
हार्ट अटँक आल्यावर पहिल्या 15 मिनिटात करा या 5 गोष्टी, वाचू शकतात प्राण
सर्दी, खोकला अन् तापही असताना कोरोना टेस्ट केली नाही? नव्या सर्वेक्षणांतून तीन महत्त्वाची कारणं उघड