Colorado Firing: अमेरिकेतील सुपरमार्केटमध्ये अंदाधुंद गोळीबार; 10 नागरिकांचा मृत्यू

या गोळीबारात स्थानिक पोलीस अधिकारी एरिक टेली यांचा मृत्यू झाला. ते 2010 पासून पोलीस दलात कार्यरत होते. | Colorado supermarket shooting

Colorado Firing: अमेरिकेतील सुपरमार्केटमध्ये अंदाधुंद गोळीबार; 10 नागरिकांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Mar 23, 2021 | 9:11 AM

न्यूयॉर्क: अमेरिकेतील कोलोरॅडो प्रांतात एका सुपरमार्केटमध्ये अज्ञात व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार (Colorado supermarket shooting ) केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये 10 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. (10 killed in Colorado supermarket shooting suspect arrested)

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलोरॅडोच्या बोल्डर परिसरातील एका सुपरमार्केटमध्ये हा प्रकार घडला. त्यानंतर पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. परंतु, पोलीस यावर फार काही बोलण्यास तयार नाहीत.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, सुपरमार्केटमध्ये सुरुवातीला गोळीबाराचा आवाज आला. त्यानंतर तीन लोक जमिनीवर पडले होते. दोन व्यक्ती पार्किंग लॉट तर एकजण सुपरमार्केटच्या दारात मरुन पडला होता.

पोलीस अधिकाऱ्यालाही ठार मारले

या गोळीबारात स्थानिक पोलीस अधिकारी एरिक टेली यांचा मृत्यू झाला. ते 2010 पासून पोलीस दलात कार्यरत होते. सुपरमार्केटमध्ये गोळीबार झाल्याचे समजले तेव्हा त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून सध्या ताब्यात घेतलेल्या संशयिताची चौकशी सुरु आहे. मात्र, याप्रकरणाचा उलगडा होण्यासाठी काही दिवस लागतील, अशी प्रतिक्रिया पोलिसांकडून देण्यात आली.

सुपरमार्केटला पोलिसांचा वेढा

या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी येत सुपरमार्केटच्या संपूर्ण परिसराला वेढा घातला. स्थानिक पोलिसांच्या मदतीला 3 हेलिकॉप्टर्सही देण्यात आली होती. सुपरमार्केटच्या समोरच्या बाजूच्या काचेच्या खिडक्या फुटल्या होत्या. यानंतर पोलिसांनी हल्लेखोराला शरण येण्यास सांगितले व त्याला ताब्यात घेतले.

गोळीबाराची घटना सोशल मीडियावर व्हायरल

या घटनेची एक क्लीप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार आम्ही भाजी खरेदी करत असताना गोळीबार सुरु झाला. मग आम्ही जमिनीवर झोपलो. हल्लेखोर तेथून निघून गेल्यानंतर आम्ही पार्किंग लॉटमध्ये आलो. तिथे दोन मृतदेह पडले होते. तेवढ्यात पोलिसांची एक गाडी वेगात आली. पोलिसांनी आम्हाला तात्काळ तेथून बाहेर पडायला सांगितले.

(10 killed in Colorado supermarket shooting suspect arrested)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.