इंडोनेशियामधून मोठी बातमी समोर येत आहे. इंडोनेशियात (Indonesia) एका फुटबॉल (football) सामन्यादरम्यान मोठा राडा झाला आहे. दोन क्लबचे समर्थक आपसात भिडले. यानंतर झालेल्या हिंसाचारात तब्बल 129 जणांना आपला जीव गमवावा लागाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांकडून मैदानात लाठीचार्ज करण्यात आला, मात्र तरी देखील दोन्ही क्लबचे समर्थक माघार घेण्यात तयारी नव्हते. या घटनेत तब्बल 129 जणांचा बळी गेला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.
घटनेबात अधिक माहिती अशी की, इंडोनेशियाच्या एका मैदानावर फुटबॉलचा सामना चालू होता. या सामनादरम्यान अचानक संबंधित दोन क्लबचे समर्थक आपसात भिडले. काही कळायच्या आत मैदानावर मोठा हिंसाचार उफाळून आला. दोन्ही गटाचे समर्थक ऐकोंमेकांना मारहाण करू लागले. ही घटना इतकी भयानक होती की या घटनेत तब्बल 129 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. मात्र हा राडा का झाला याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मैदानात धाव घेतली. वाद मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र वाद अधिक चिरघळल्याने अखेर पोलिसांनी लाठीचार्ज केला. आधीच दोन्ही गटाकडून सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे परिस्थिती गंभीर बनली होती. त्यातच पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केल्यामुळे परिस्थिती अधिक चिरघळली. या सर्व प्रकारामध्ये तब्बल 129 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. मैदानात पोलीस दाखल होताच दोन्ही गटाचे समर्थक वाट दिसेल तिकडे पळताना आपल्याला व्हिडीओमधून दिसून येत आहे.