बॉक्सिंगचा सामना बघून परताना विमान कोसळलं

नवी दिल्ली : मेक्सिकोच्या उत्तरेकडील डोंगराळ भागात एक प्रवासी विमान कोसळलं. या विमानात एकूण 13 प्रवासी होते. या दुर्घटनेत पायलटसह सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केला जात आहे. दुर्घटनाग्रस्त विमानात एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश होता. हे सर्व लास वेगास येथून बॉक्सिंगचा सामना बघून परतत होते. या खासगी विमानाने रविवारी 5 मे रोजी लास […]

बॉक्सिंगचा सामना बघून परताना विमान कोसळलं
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

नवी दिल्ली : मेक्सिकोच्या उत्तरेकडील डोंगराळ भागात एक प्रवासी विमान कोसळलं. या विमानात एकूण 13 प्रवासी होते. या दुर्घटनेत पायलटसह सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केला जात आहे. दुर्घटनाग्रस्त विमानात एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश होता. हे सर्व लास वेगास येथून बॉक्सिंगचा सामना बघून परतत होते.

या खासगी विमानाने रविवारी 5 मे रोजी लास वेगास येथून उड्डाण केलं. या दुर्घटनेनंतर विमानात प्रवास करत असलेला कुठलीही व्यक्ती जिवंत नसल्याची भीती कोहूइला (मेस्किको येथील राज्य) सरकारने व्यक्त केली. या विमानात प्रवास करत असलेले सर्व प्रवासी हे 19 ते 57 वयोगटातील असल्याची माहिती आहे.

मेक्सिकोच्या वृत्तवाहिन्यांवर या विमानाचा एक फोटो प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये या विमानाचा काही भाग जळताना दिसून आला. विमानातील सर्व प्रवासी हे लास वेगास येथे शनिवारी बॉक्सिंगचा सामना बघण्यासाठी गेले होते.

मेक्सिकोच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाच्या रिपोर्टनुसार, या विमानाने रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास लास वेगास येथून उड्डाण केलं. उड्डाण केल्याच्या दोन तासांनंतर या विमानाशी संपर्क तुटला. काही वृत्तांनुसार, पायलटने वादळापासून वाचण्यासाठी विमानाला मधे कुठेतरी थांबवण्यासाठी सिग्नल दिले होते. खराब हवामानामुळे ही दुर्घटना झाल्याचं सांगितलं जात आहे.

दुर्घटनाग्रस्त विमान हे ‘चॅलेंजर 601’ होतं. उड्डाणानंतर 280 किलोमीटरचं अंतर पार केल्यानंतर या विमानाशी संपर्क तुटला. विमान कंपनीने या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांप्रती दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच, या दुर्घटनेचा तपास करण्यात येईल असं आश्वासनही दिलं आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO : मॉस्कोत विमानाला भीषण आग, 41 प्रवासी जळून खाक

‘ही’ पॉप स्टार कधीही आई बनू शकणार नाही

सत्संगादरम्यान महिलांशी गैरवर्तन, आनंद गिरी महाराजांना ऑस्ट्रेलियात बेड्या

कुत्र्याने तब्बल 14,500 रुपयांच्या नोटा खाल्ल्या, उपचाराला त्यापेक्षा जास्त खर्च

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.