जेरुसलेम : इस्रायल आणि पॅलस्टाईनमध्ये जोरदार रॉकेट वॉर सुरु आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर होत असलेल्या रॉकेट हल्ल्यात अनेक इमारती उद्धवस्त होत आहेत. रॉकेट हल्ल्यांमध्ये आतापर्यंत गाझात 14 मुलांसह 65 लोकांचे मृत्यू झालेत. दुसरीकडे इस्रायलमध्ये देखील 7 लोकांचा मृत्यू झालाय. इस्रायली रॉकेट हल्ल्यात हमासचे अनेक कमांडर मारले गेले आणि गाझा पट्टीतील बहुमजली इमारत कोसळली. दक्षिण इस्त्रायलमधील बर्याच ठिकाणी रॉकेटचा फटका बसल्याचे अहवालात म्हटले आहे. (14-storey building demolished in Israeli racket attack)
गाझा पट्टीतील हल्लेखोरांनी सांगितले की त्यांनी इस्रायलवर 130 रॉकेट गोळीबार केल्या. इस्रायलकडून करण्यात आलेल्या एअरस्ट्राईकद्वारे गाझा शहरातील अल-शारूक टॉवर उद्ध्वस्त केल्याच्या प्रत्युत्तरात त्यांनी हे केले आहे. या टॉवरमध्ये हमासद्वारे चालवण्यात येणाऱ्या अल-अक्सा टीव्हीचे मुख्यालय होते. बुधवारी इस्रायली हवाई हल्ल्यांनी गाझा शहरातील 14-मजली अल-शारुक टॉवर पूर्णपणे उध्वस्त केल्याचा हा क्षण आहे. (14-storey building demolished in Israeli racket attack)
This is the moment the 14-storey al-Shorouq tower, housing media offices in Gaza City, was completely destroyed by multiple Israeli air raids on Wednesday. pic.twitter.com/baBuOrtbQk
— Al Jazeera English (@AJEnglish) May 13, 2021
इतर बातम्या
Video: जेव्हा अल जझिराची रिपोर्टर LIVE करत असताना रॉकेट हल्ला होतो