अफगाणिस्तानातील ऐबक येथे नमाज अदानंतर मदरशात बॉम्बस्फोट, 15 ठार, 27 जखमी
अफगाणिस्थानमध्ये दुपारच्या प्रार्थनेनंतर मशिदीत बॉम्ब स्फोट करण्यात आला. यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
ऐबक, अफगाणिस्तानच्या (Afghanistan Bomb Blast) समंगन प्रांतातील ऐबक शहरातील जाहदिया मदरशात आज बुधवारी दुपारी बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात 15 जणांचा मृत्यू झाला तर 27 जण जखमी झाले. हा स्फोट दुपारच्या नमाजनंतर झाला. अफगाणिस्तानच्या टोलो न्यूजने प्रांतीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
कोणी केला हल्ला?
उत्तर अफगाणिस्तानमधील एका धार्मिक शाळेत झालेल्या बॉम्बस्फोटात किमान 10 विद्यार्थी ठार झाले, असे तालिबानच्या अधिकाऱ्याने सांगितले. गृह मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल नाफी तकोर यांनी सांगितले की, उत्तरी सामंगन प्रांताची राजधानी ऐबक येथे झालेल्या स्फोटात अनेक जण जखमी झाले आहेत. आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
अफगाणिस्तानची राजधानी काबूलपासून सुमारे 200 किमी उत्तरेस असलेल्या ऐबक येथील एका डॉक्टरने सांगितले की, मृतांमध्ये बहुतांश तरुण आहेत. ही सर्व सामान्य नागरिक आहेत, असे त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितले. त्याचवेळी, तालिबानचे म्हणणे आहे की, गेल्या वर्षी देशाचा ताबा घेतल्यापासून त्यांचे लक्ष युद्धग्रस्त देशाच्या सुरक्षेवर आहे.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तालिबान सत्तेत परत आल्यापासून, नागरिकांना लक्ष्य करणारे डझनभर स्फोट आणि हल्ले झाले आहेत, त्यापैकी बहुतांश हल्ल्याच्या दावा ISIS ने केला आहे.
भारताच्या सीमा सुरक्षित
बीएसएफचे महानिरीक्षक (जम्मू-फ्रंटियर) डी.के. बुरा म्हणाले, सीमा सुरक्षा दलाने चांगले काम केले आहे आणि शेजारील देशांनी अनेक प्रयत्न करूनही आंतरराष्ट्रीय सीमा धोक्यांपासून मुक्त ठेवली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. सीमेपलीकडून घुसखोरीचे सात प्रयत्न झाले आणि ते सर्व हाणून पाडण्यात आले आल्याचे बुरा म्हणाले.
कारवाईत चार एके-४७ रायफल, दारूगोळा आणि पन्नास किलो हेरॉइन जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बीएसएफचे आयजी बुरा यांनीही जम्मू-फ्रंटियरला या वर्षासाठी सर्वोत्कृष्ट फ्रंटियर ट्रॉफी प्रदान करण्यात आल्याचे नमूद केले. यासाठी मी अधिकारी आणि जवानांचे अभिनंदन करतो, असे ते म्हणाले.