इस्रायलमध्ये 42,000 महिलांनी मागितला बंदूकीचा परवाना, नेमके काय आहे कारण ?

गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात हमास आणि इस्रायलमध्ये सुरु झालेल्या युद्धाला जवळपास आठ महिने झाले असले तरी त्यातून काहीच निष्पन्न झालेले नाही. आता इस्रायल येथील महिलांना बंदूकीचा परवाना घेणे सुरु केले आहे. त्यामुळे आता सरकारवर महिलांचा विश्वास राहीलेला नसल्याचे म्हटले जात आहे...

इस्रायलमध्ये 42,000 महिलांनी मागितला बंदूकीचा परवाना, नेमके काय आहे कारण ?
women applying for gun permitsImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jun 22, 2024 | 7:55 PM

इस्रायल आणि हमास यांचे युद्ध सुरु होऊन आठ महिने झाले आहेत. गेल्यावर्षी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासच्या अतिरेक्यांनी हल्ला केल्यानंतर इस्रायलने गेली आठ महिने गाझापट्टी संपूर्ण भाजून काढली आहे. आता ही जगाच्या अनेक देशांनी मध्यस्थी करुनही हे युद्ध काही थांबायचे नाव घेत नाहीए..आता देशातील महिलांना सध्या वेगळाच निर्णय घेतला आहे. इस्रायलच्या 42 हजार महिलांनी गन परमिटसाठी सरकारकडे अर्ज केला आहे.

हमासच्या अतिरेक्यांनी गेल्यावर्षी केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलच्या महिला स्वत: असुरक्षित समजत आहेत. त्यामुळे त्यांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी बंदूकीचा परवान्यासाठी अर्ज केला आहे. 42 हजार महिलांनी गनसाठी परवाना मिळावा असा अर्ज केला आहे. तेथे आता 18,000 अर्जांना स्वीकारण्यात आले आहे. जेव्हापासून इस्रायलमध्ये उजव्या विचारांचे सरकार आले आहे. तेव्हापासूनच नेत्यान्याहू यांच्या सरकारने स्व-संरक्षणासाठी गन खरेदीचे नियम शिथील केले आहेत. त्यामुळे महिला आता पुढे येऊन बंदूकी खरेदीसाठी अर्ज करीत आहेत.

महिला का खरेदी करताय बंदूका ?

सध्या इस्रायलमध्ये 15 हजाराहून अधिक महिलांकडे बंदूक आहे. तर दहा हजार महिला बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. आपल्या सुरक्षेसंदर्भात महिला आता अधिक चिंतीत झाल्या आहेत. हमासच्या हल्ल्यानंतर आपल्या कुटुंबाचे संरक्षण व्हावे यासाठी महिलांची पहिली प्राथमिकता झाली आहे. त्यामुळे बंदूकीला स्वत:चे आणि स्वत:च्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी जास्त जवळ केले जात आहे. परंतू प्रत्येकाला ही बंदूक संस्कृती पसंद नाही अनेक जण या निर्णयामुळे नाराज देखील आहेत. त्यामुळे या धोरणावर टीका देखील होत आहे.

युद्धाला सुरुवात अशी झाली

गेल्यावर्षी 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या अतिरेक्यांनी मोटर पॅराग्लायडिंगच्या मदतीने आकाशातून प्रवेश करीत इस्रायलवर मोठा हल्ला केला. यावेळी अनेक इस्रायली महिला आणि मुलांचे अपहरण करुन त्यांना ओलीस ठेवण्यात आले होते. यात सैनिकांचा देखील समावेश होता. या हल्ल्याने इस्रायलच्या भक्कम सुरक्षेचे दावे पोकळ निघाले. त्यानंतर अपमान झालेल्या इस्रायलने हमासला संपविण्याची शपथ घेतली. आणि युद्धाला सुरुवात झाली. दोन्ही बाजूंनी मृत्यूचे आकडे माणूसकीला लाजविणारे आहेत. इस्रायलच्या इतक्या मोठ्या कारवाईनंतरही हमास संपूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे युद्ध आता कोणत्या वळणावर जाते याची भीती सर्वांना लागली आहे.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.