भिकाऱ्याकडे सापडली 5 लाखांची कॅश आणि पासपोर्ट, कुठे घडली घटना?

बॉलीवूडमध्ये एका चित्रपटात अभिनेता अन्नू कपूर मुंबईतील भिकाऱ्यांची संघटना काढताना दाखविला आहे. तो प्रत्येकाला विविध नाक्यांवर भीक मागायला सांगतो. त्यात एक डायलॉक जाम प्रसिद्ध झाला होता. मंत्रालयाच्या समोरच्या रोडवर भीक मागू नका कारण तेथे ऑलरेडी भिकारी बसलेत असा तो डायलॉग खूपच गाजला होता...

भिकाऱ्याकडे सापडली 5 लाखांची कॅश आणि पासपोर्ट, कुठे घडली घटना?
beggar file photo
Follow us
| Updated on: Jul 30, 2024 | 5:35 PM

देशाची आर्थिक राजधानीत भिकाऱ्याकडे भिक्षा मागून त्यांनी लाखो रुपयांची कॅश जमवल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. आताची ताजी ही घटना आपला कंगेहाल शेजारी पाकिस्तान येथील आहे. येथे एक आश्चर्यकारक भिकारी आढळला आहे. त्याच्या खिशातून पाच लाखांहून अधिक रक्कम सापडली आहे. हा वयोवृद्ध भिकारी रस्त्यात निपचित पडला होता. त्याला हॉस्पिटलमध्ये नेते असताना पाच लाख रुपयांची रोकड त्याच्याकडे सापडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

पाकिस्तानी न्यूज चॅनल जिओ टीव्हीवरील बातमीनूसार हा भिकारी पंजाब प्रांतातील आहे. पाकिस्तानच्या पंजाबातील सरगोधा जिल्ह्याच्या खुशाब रोडवर हा भिक्षेकरी बेशुद्ध पडलेल्या अवस्थेत सापडला होता. रेस्क्यू टीमने त्याची झडती घेतली असता त्यांच्याकडे 5 लाख 34 हजार रुपये सापडले.

अनेकदा सौदी अरबची वारी

हा भिकारी इंटरनॅशनल आहे. कारण याच्याकडे एक पासपोर्ट देखील सापडला आहे. त्याच्या पासपोर्टवरील स्टँपमुळे त्याने अनेकदा सौदी अरबची वारी केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे तो सौदीत जाऊन देखील भीक मागत असावा असा संशय आहे. आम्हाला एका अनोळखी व्यक्तीने कॉल करुन सांगितले की एका रस्त्यावर एक जण निपचित पडला आहे.आम्ही या माणसाच्या सुटकेसाठी रेस्क्यू टीम पाठविल्याचे त्यांनी सांगितले. हा भिकारी आता नीट बरा झाला आहे. त्याला त्याचे सर्व साहित्य परत केले असून त्याला डिस्चार्ज देखील मिळाला आहे.

उमराहच्या नावाने भिक मागतात

पाकिस्तानचे नागरिक उमराह व्हीसाच्या आधारे सौदीत जाऊन भीक मागण्याच्या धंदा करतात अशा बातम्या सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. पाकिस्तानी एनआयआर मंडळी आणि मनुष्यबळ विकास खात्याच्या मंत्रालयाने माहिती देताना सांगितले की भिकारी मानवी तस्करीच्या माध्यमातून परदेशात जातात. परदेशात अटक झालेल्यामध्ये 80 टक्के भिकारी मूळचे पाकिस्तानी नागरिक आहेत. इराक आणि सौदी अरबच्या राजदूतांनी सांगितले की अशा प्रकारच्या कारवाईमुळे तेथील तुरुंग भरलेले आहेत. सौदी अरब मस्जिद अल हरमच्या बाहेर  झालेल्या कारवाईत पकडलेले अनेक पॉकेटमार मूळचे पाकिस्तानचे आहेत. हे लोक भीक मागण्यासाठी उमराह यात्रेचा व्हीसा मिळवून सौदीला भीक मागायला पोहचतात अशी माहिती त्यांनी दिली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.