विद्यार्थ्यांचे ‘दम मारो दम’ आणि विद्यार्थिनींचे ‘ते’ 5500 व्हिडिओ व्हायरल, शिक्षकांच्या रॅकेटचा पर्दाफाश
इस्लामिया विद्यापीठात हजारो विद्यार्थी शिकण्यासाठी जातात. आपल्या मुलांना चांगल्या विद्यापीठात प्रवेश मिळाल्याने पालकांना निश्चिंतता मिळते. पंरतु, समोर आलेल्या धक्कादायक बाबींमुळे पालकांच्या काळजात धडधड वाढलीय.
इस्लामाबाद । 7 ऑगस्ट 2023 : त्या विद्यापीठातील विद्यार्थी कॉलेजला जायचे. पण, मॅथ्स, इंग्लिश, सायन्स, कॉमर्स शिकायला नाही तर सेक्स चॅट करायला. विद्यार्थ्यांकडे कॉलेजची बॅग तर असायची पण त्यात नोटबुक्स नसायची. त्यांच्याकडे असायचे ड्रग्ज, सेक्स पॉवर वाढवण्याच्या गोळ्या आणि कंडोमची पाकिटे. तिथे शिक्षक लेक्चर द्यायचे, पण अभ्यासाबद्दल नाही तर सेक्स पार्टीबद्दल. विद्यार्थ्यांमध्ये चर्चा व्हायची, पण परीक्षेच्या दबावाबाबत नाही तर विद्यार्थिनींच्या अश्लील व्हिडिओची. विद्यापीठामधील हे घाणेरडे चित्र जगासमोर आले आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला.
पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील बहावलपूर येथील इस्लामिया विद्यापीठातील शेकडो विद्यार्थिनींचे तब्बल 5500 अश्लील व्हिडिओ समोर आले आहेत. पंजाब प्रांताचे कार्यवाहक मुख्यमंत्री सय्यद मोहसीन रझा नक्वी यांनी याची दखल घेतली असून पोलिसांनी हा अश्लील व्हिडिओ प्रकरण दडपण्यास सुरुवात केली आहे. विद्यापीठाचे संचालक डॉ. अबुजार, मुख्य सुरक्षा अधिकारी सय्यद एजाज शाह आणि वाहतूक अधिकारी अल्ताफ यांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.
विद्यापीठाचे भयावह चित्र
पाकिस्तानातील एका सेक्स स्कँडलने संपूर्ण जगाला हादरा बसला आहे. मुले, मुली आणि शिक्षकांच्या बॅगामधून सेक्स पॉवर वाढवणारी औषधे सापडली आहेत. हा प्रकार पाकिस्तानच्या इस्लामिया विद्यापीठात घडलाय. काही दिवसांपूर्वी पाकिस्तान पोलिसांना या विद्यापीठात मोठे सेक्स रॅकेट सुरू असल्याची खबर मिळाली. मात्र, हे प्रकरण इतके मोठे असेल याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती.
5500 व्हिडिओ व्हायरल
पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तेव्हा त्यांना विद्यापीठातील शेकडो मुलींचे 5500 अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याचे आढळून आले. या विद्यापीठात ड्रग्जपासून ते देहविक्रीपर्यंतचा धंदा सुरू असल्याचे तपासात उघड झाले. हा प्रकार एक दोन महिने नव्हे तर वर्षानुवर्षे हा घाणेरडा प्रकार सुरु होता. कुणाला त्याची पुसटशीही कल्पना आली नाही कारण या प्रकारच्या विद्यार्थ्यांसह शाळेतील शिक्षकांचाही सहभाग होता.
3 बड्या अधिकाऱ्यांना अटक
याप्रकरणी पोलिसांनी विद्यापीठाचा खजिनदार याच्यासह अन्य दोन अधिकाऱ्यांना अटक केली आहे. हे अधिकारी विद्यापीठाचे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून अनेक आक्षेपार्ह वस्तू, प्रतिबंधित औषधे, अश्लील चित्रफिती जप्त केल्या आहेत. चौकशीदरम्यान त्यांनी विद्यापीठात ड्रग्जचा पुरवठा करत असल्याची कबुली दिली. महाविद्यालयात अनेक शिक्षकांच्या मदतीने ड्रग्सचे रॅकेट सुरू होते. विद्यार्थ्यांना औषधांचा पुरवठा करण्यात येत होता. तसेच, शिक्षकांच्या मदतीने अनेक सेक्स पार्ट्याही आयोजित केल्याची माहिती त्यांनी दिली.
वर्षानुवर्षे सुरू होता हा प्रकार
गरीब कुटुंबातील विद्यार्थिनीना जाळ्यात अडकवून नंतर त्यांचे व्हिडिओ बनवले जात होते. त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून देहविक्रीचा धंदा करण्यात येत होता. अनेक वर्षांपासून हा घाणेरडा प्रकार सुरू होता. मात्र, बदनामीच्या भीतीमुळे विद्यार्थिनी पुढे येत नव्हत्या अशी माहिती पोलिसांनी दिली.