शक्तीशाली भूकंपाने एकाचवेळी तीन देश हादरले; जीवमुठीत घेऊन नागरिकांचं घरातून पलायन

| Updated on: Feb 23, 2023 | 8:13 AM

यापूर्वी तुर्की आणि सीरियामध्ये 20 फेब्रुवारी रोजी भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता 6.4 एवढी होती. या भूकंपात सहा लोकांचा मृत्यू झाला होता. तर 294 लोक जखमी झाले होते.

शक्तीशाली भूकंपाने एकाचवेळी तीन देश हादरले; जीवमुठीत घेऊन नागरिकांचं घरातून पलायन
Earthquake
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

फैजाबाद : गेल्या काही महिन्यांपासून जगभरात भूकंपाचे सतात्याने धक्के जाणवत आहेत. काल भारत आणि नेपाळच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर आज अफगाणिस्तान आणि तजाकिस्तानमध्ये पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. चीनच्या काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर 6.8 एवढी तीव्रता या भूकंपाची नोंदवली गेली. मात्र, या तिन्ही देशात झालेल्या भूकंपामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचं वृत्त अद्याप आलेलं नाही.

TV9 Marathi Live | Sanjay Raut Vs Shrikant Shinde | Supreme Court Hearing | Pune Election | Shivsena

अफगाणिस्तानात आज पहाटे 6 वाजून 7 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू फैजाबादपासून 265 किलोमीटर अंतरावर होता. यूएसजीएसच्या नुसार, तजाकिस्तानमध्ये सकाळी 6 वाजून 7 मिनिटांनी 6.8 तीव्रतेचा भूकंप आला. हा भूकंप इतका शक्तीशाली होता की चीनच्या झिजियांग क्षेत्रातही या भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवताच हजारो नागरिकांनी जीवमुठीत घेऊन घरातून पलायन केलं. सुरक्षित ठिकाणी जाणं या नागरिकांनी पसंत केलं.

हे सुद्धा वाचा

भूकंप अधिक शक्तीशाली होता

चीनी भूकंप नेटवर्कच्या मते हा भूकंप अधिक शक्तीशाली होता. हा भूकंप 7.2 रिश्टर स्केल एवढा होता असं सांगितलं जातं. जमिनीच्या 10 किलोमीटर आत या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. अनेक एजन्सीचे प्राथमिक भूकंपीय माप वेगवेगळे असतात. त्यामुळे चीनी नेटवर्कने भूकंपाच्या तीव्रतेचा वेगळा आकडा सांगितला आहे. या आधी काल नवी दिल्ली आणि एनसीआरच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले होते. मात्र, या भूकंपाची तीव्रता अधिक नव्हती. त्यानंतर थोड्याच वेळाने नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता 5 हून अधिक होती.

41 हजार लोक दगावले

यापूर्वी तुर्की आणि सीरियामध्ये 20 फेब्रुवारी रोजी भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता 6.4 एवढी होती. या भूकंपात सहा लोकांचा मृत्यू झाला होता. तर 294 लोक जखमी झाले होते. त्यापैकी 18 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सीरियातील हामा आणि टार्टस प्रांतात भूकंपाच्या दहशतीमुळे एक महिला आणि एका तरुणीचा मृत्यू झाला होता.

तुर्कीत सोमवारी झालेल्या भूकंपाचा केंद्र बिंदू डनेफे शहरात होता. 6 फेब्रुवारी रोजी तुर्कीत 7.8 रिश्टर स्केल एवढा भूकंप आला होता. त्यावेळीही डनेफे शहरात मोठं नुकसान झालं होतं. या भूकंपामुळे अनेक घरे जमीनदोस्त झाली आहेत. काही घरे मोडकळीस आली आहेत. त्यामुळे आपआपल्या घरात जाऊ नका, अशा सूचना प्रशासनाने नागरिकांना दिल्या आहेत. मात्र, लोक प्रशासनाचं ऐकताना दिसत नाहीयेत.

सोमवारी आलेल्या भूकंपामुळे तुर्की आणि सीरियातील काही भाग हादरून गेला आहे. दोन आठवड्यापूर्वीही तुर्की आणि सीरियात मोठा भूकंप झाला होता. या भूकंपामुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला होता. या भूकंपामुळे तुर्कीत कमीत कमी 41,156 लोक दगावले होते.