बस चालवताना ड्रायव्हर अचानक बेशुद्ध, 7 वीतल्या विद्यार्थ्याच्या प्रसंगावधानाने वाचवले 66 विद्यार्थ्यांचे प्राण
बुधवारी ही घटना घडली तेव्हा बसमध्ये 66 विद्यार्थी होते. त्या विद्यार्थ्याच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आणि सर्वांचे प्राण वाचले.
मिशिगन : चालक बेशुद्ध पडल्याने इयत्ता 7 वीच्या विद्यार्थ्याने (7th grade student) शाळेच्या बसवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रसंगावधान राखत तत्काळ उडी मारून आपल्या वर्गमित्र आणि इतर विद्यार्थ्यांचे प्राण वाचवले. बुधवारी अमेरिकेतील मिशिगनमध्ये (Michigan) ही घटना घडली. हा बस ड्रायव्हर गाडी चालवत असताना त्याने अचानक मान (unconcious driver)टाकली. त्यानंतर डिलन रीव्ह्स या विद्यार्थ्याने ड्रायव्हरच्या जवळ येऊन स्टीअरिंग व्हील सांभाळत गाडी थांबवली, हे कॅमेऱ्यात कॅप्चर झाले. वॉरेन कन्सोलिडेटेड स्कूल्सने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये हे चित्र दिसले. फॉक्स 2 डेट्रॉईटच्या म्हणण्यानुसार, बुनर्ट रोडजवळील मेसोनिक बुलेव्हार्डवर बस एका सुरक्षित थांब्यावर डिलन हा यशस्वी झाला.
या संदर्भात पोलिसांनी अधिक माहिती दिली. सुप्रीटेंडंट रॉबर्ट लिव्हरनॉइस म्हणाले की, त्या वेळी बस रहदारी असणाऱ्या प्रदेशात प्रवेश करत होती. बस ड्रायव्हर बेशुद्ध झाल्याचे दिसतात डिलनने स्टिअरिंग तर सांभाळलेच पण पॅनिक न होता, इतर विद्यार्थ्यांना 911 वर कॉल करण्यास सांगितले. फॉक्स 2 डेट्रॉईटनुसार.या घटनेच्या वेळी सुमारे बसमध्ये 66 प्रवासी होते. बसमधील इतर विद्यार्थी थोडे घाबरले व त्यांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या.
लिव्हरनॉइस यांच्या सांगण्यानुसार, त्या बस ड्रायव्हरने आपली तब्येत बरी नसल्याचे आधीच ट्रान्सपोर्टेशन बेसला कळवले होते. मात्र ड्रायव्हर बेशुद्ध झाली तेव्हा डिलन ड्रायव्हरच्या मागे पाचव्या रांगेत होता आणि ड्रायव्हरचे भान हरपल्याचे लक्षात आल्यानंतर काही सेकंदातच त्याने कृती करत स्टिअरिंग व्हील सांभाळले.
7वीत शिकणाऱ्या मुलाने ड्रायव्हरला अडचणीत पाहिले, आणि प्रसंगावधान राखून बस कंट्रोल केल. त्यामुळे कोणतीही दुर्घटना न होता, बस थांबवण्यास मदत केली. या घटनेनंतर वॉरेन पोलिस आणि अग्निशमन विभागांनी अतिशय त्वरीत प्रतिसाद दिला, ड्रायव्हरकडे लक्ष दिले आणि विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी सुरक्षितपणे वेगळ्या बसमध्ये बसवले गेले,” अशी माहिती पोलिसांनी दिली.
बस थांबवण्यास वेळेवर मदत करणाऱ्या विद्यार्थ्याच्या कृतीने आज सर्व फरक पडला आहे आणि मला त्याच्या प्रयत्नांचा अभिमान वाटतो, असेही पोलिसांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर संपूर्ण शाळेने गुरुवारी डिलनला एका विशेष समारंभात अभिवादन केले जेथे लोकांनी त्यांनी दाखवलेल्या शौर्याबद्दल ऐकले, व त्याचे कौतुकही केले.