8 वर्षाच्या मुलाने गेम खेळून 24 लाख रुपये कमावले, तुम्हालाही हा गेम हमखास जमेल?

एका 8 वर्षीय मुलाने गेम खेळून तब्बल 24 लाख रुपये कमावले आहेत आणि ही त्याची केवळ सुरुवात आहे.

8 वर्षाच्या मुलाने गेम खेळून 24 लाख रुपये कमावले, तुम्हालाही हा गेम हमखास जमेल?
Follow us
| Updated on: Mar 06, 2021 | 6:08 PM

वॉशिंग्टन : बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात अनेक लहानमुलं आता अगदी बालपणीच मोबाईल हाताळण्यात तरबेज होताना दिसतात. मोबाईल सुरु करण्यापासून तर अगदी त्यावर व्हिडीओ पाहणे, गेम खेळणे इत्यादी गोष्टी ही लहान मुलं सहजपणे करतात. हे पाहून अनेकांना विशेष वाटतं. काही पालक लहान मुलांच्या गेम खेळण्याच्या या सवयीला वैतागूनही जातात. कारण यामुळे ही मुलं अभ्यास करत नाहीत आणि त्यामुळे त्यांचं करियर कसं होणार असा प्रश्न पालकांना पडतो. मात्र, अशा पालकांसाठी अमेरिकेतील एक 8 वर्षीय मुलगा प्रेरणा देणारा ठरेल. त्याने गेम खेळून तब्बल 24 लाख रुपये कमावले आहेत आणि ही त्याची केवळ सुरुवात आहे (8 year Boy get 24 lakh rupees for playing Fortnite game in California America).

गेम खेळून 24 लाख रुपये जिंकणाऱ्या या मुलाचं नाव जोसेफ डीन असं आहे. तो अमेरिकेतील कॅलिफोर्नियात राहतो. जगप्रसिद्ध गेम फोर्टनाईट (Fortnite) खेळणारा तो जगातील सर्वात लहान मुलगा आहे. त्याचं ही गेम खेळण्यातील कसब पाहून टीम 33 कडून त्याला एक हायस्पीड कंम्प्युटर आणि 24 लाख रुपये देऊन करारबद्ध करण्यात आलंय. त्यामुळे या मुलाचं नशीब फळफळल्याची चर्चा आहे.

दररोज 2 तास गेम खेळतो, खेळण्याआधी आईची परवानगी घेतो

जोसेफ केवळ 4 वर्षांचा असल्यापासून फोर्टनाईट सारखी अवघड गेम खेळतोय. त्यामुळे ही गेम खेळण्याचं त्याचं कौशल्य खूपच वाढलंय. विशेष म्हणजे त्याच्या आईवडिलांना तो गेम खेळत असल्याबद्दल कोणतीही तक्रार नाही. त्याचे आईवडिल सांगतात की तो शाळेतून आल्यावर दररोज 2 तास गेम खेळतो. गेम खेळायला जाताना तो कायम आपल्या आईला विचारतो. सुट्टीच्या दिवशी मात्र तो जास्तवेळ गेम खेळतो.

“मोठं होऊन व्यावसायिक गेमर व्हायचं”

जोसेफला मोठं होऊ डॉक्टर किंवा इंजिनियर बनायचं नाही. त्याला एक चांगला व्यावसायिक गेमर बनायचं आहे. जोपर्यंत टीम 33 ने त्याला 24 लाख रुपये देत करार केला नाही तोपर्यंत त्याला कुणीही गांभीर्याने घेत नव्हतं. मात्र, आता सर्वजण गांभीर्याने घेत आहेत. जोसेफच्या पालकांनी त्याला मिळालेले पैसे त्याच्या नावाने बचत खात्यात टाकले आहेत. हे पैसे त्यालाच भविष्यात उपयोगी येतील, असं त्याच्या आईवडिलांनी सांगितलंय.

हेही वाचा :

ल्युडोमध्ये बाबांची चीटिंग, 24 वर्षीय तरुणीची कोर्टात धाव

पबजी खेळताना झटके येऊन बेशुद्ध, उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

पब्जी गेमचा विक्रम, जगातील सर्वाधिक कमाई करणार अॅप

व्हिडीओ पाहा :

8 year Boy get 24 lakh rupees for playing Fortnite game in California America

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.