Space War: आता थेट चंद्रावर होणार अमेरिका आणि चीनची लढाई; लँडिग मिशनवरुन वाद
नासाने आर्टेमिस 3 या चंद्रयान मोहिमेची जोरदार तयारी सुरु केली आहे. 50 वर्षांपूर्वी मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले आहे. आता आपल्या आर्टेमिस मिशन अंतर्गत पुन्हा एकदा मानवाला चंद्रावर पाठवण्यासाठी नासाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तर चीनकडून चंद्रमोहिम आखली जात आहे.
नवी दिल्ली : जागतिक महासत्ता असलेला अमेरिका आणि संपूर्ण जगाच्या टार्गेटवर असेलेले चीन यांच्यात आता थेट चंद्रावर लढाई होणार आहे. याचे कारण आहे ते चंद्रयान मोहिम. चंद्रावर उतरवल्या जाणाऱ्या रॉकेटच्या लँडिंग जागेवरुन या दोन्ही देशांमध्ये सध्या वादाची ठिणगी पडणार आहे. अमेरिका चंद्रावर जिथे आपले रॉकेट लँड करणार आहे तिथेच आपले रॉकेट उतरवण्याचा चीनचा मनसुबा आहे. यामुळे या जागांवरुन अमेरिका आणि चीन यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे.
नासाने आर्टेमिस 3 या चंद्रयान मोहिमेची जोरदार तयारी सुरु केली आहे. 50 वर्षांपूर्वी मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले आहे. आता आपल्या आर्टेमिस मिशन अंतर्गत पुन्हा एकदा मानवाला चंद्रावर पाठवण्यासाठी नासाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तर चीनकडून चंद्रमोहिम आखली जात आहे.
अंतराळवीर चंद्रावर कुठे उतरतील? आता यावरून अमेरिका आणि चीनमध्ये युद्ध होणार आहे. नासाने आपली मोहिम फत्ते करण्यासाठी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील 13 जागांची यादी निश्चित केली आहे. मात्र, यापैकी तीन जागांवर चीनलाही आपले मिशन उतरवायचे आहे. आर्टेमिस 3 मोहिमेच्या माध्यमातून अंतराळवीरांना चंद्रावर पाठवण्याची नासाची योजना आहे.एसएलएस रॉकेट आणि ओरियन स्पेसक्राफ्टच्या मदतीने नासा अंतराळवीरांना चंद्रावर पाठवणार आहे. तर दुसरीकडे चीनने आपल्या चांगई-5 लुनार मिशन ही योजना आखली आहे. यासाठी चीनने दहा जागा शोधल्या आहेत जिथे अंतराळवीरांना उतरवता येईल. अमेरिका आणि चीनने लँडिंगसाठी निवडलेल्या जागांपैकी तीन जागा या ओव्हरलॅप होत आहेत.
तैवानवरुन अमेरिका आणि चीनमध्ये तणाव
सध्या तैवानवरुन अमेरिका आणि चीनमध्ये तणाव आहे. अंतराळ मोहिमांबाबत चर्चा करण्यासाठी चीन आणि अमेरिका यांच्यात US-चीन सिव्हिल स्पेस डायलॉग ही समिती स्थापन करण्यात आली आहे. 2017 मध्ये या समितीने शेवटची चर्चा केली होती. लँडिंग साठी योग्य असलेल्या चंद्रावरील जागांची एक यादी तयार करण्यात आली आहे. फॉस्टिनी रिम ए, शेकलटन जवळ हिल, कनेक्टिंग रिज, कनेक्टिंग रिज एक्स्टेंशन, डी जर्लेश रिम 1, डी जर्लेश रिम 2, डी जर्लेश-कोशर मॅसिफ, हॉवर्थ, मालापर्ट मॅसिफ, लीबनिट्झ बीटा पठार, नोबिल रिम 1, नोबल रिम 2 अशी या जागांची नावे आहे. चंद्रावरील या सर्व जागा अंतराळवीर तसेच लाँचर उतरवण्यासाठी योग्य आहेत.