शांततेचे धर्मगुरू यांच्याकडून झाली एक चूक, ट्रोल झाल्यानंतर मागावी लागली माफी ?

दलाई लामा यांच्याकडून एक चूक झाली. ती चूक झाल्याचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर एकच चर्चा सुरु झाली. सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आले.

शांततेचे धर्मगुरू यांच्याकडून झाली एक चूक, ट्रोल झाल्यानंतर मागावी लागली माफी ?
DALAI LAMAImage Credit source: TV9 NETWORK
Follow us
| Updated on: Apr 10, 2023 | 5:08 PM

तिबेट : जगातील सर्वश्रेष्ठ धर्मगुरू, बौद्ध धर्माचे धार्मिक नेते आणि शांततेसाठी ज्यांना नोबेल पारितोषिक मिळाले असे दलाई लामा वेगवेगळ्या प्रकारे आपली आपुलकी जनतेप्रती दाखवीत असतात. मात्र, दलाई लामा यांच्याकडून एक चूक झाली. ती चूक झाल्याचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर एकच चर्चा सुरु झाली. सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आले. काहींनी तर त्यांच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत कारवाईची मागणी केली. पण, झाल्या प्रकाराची त्यांनी माफी मागितली. इतकेच नव्हे तर त्यांनी शांती आणि आनंद निर्माण करणाऱ्या चांगल्या माणसांचा शोध घ्या. जे इतरांना मारतात त्यांच्या मागे जाऊ नका असा संदेशही दिला.

धर्मगुरू आणि अध्यात्मिक नेते दलाई लामा यांचा एक कार्यक्रम होता. धर्मगुरू या कार्यक्रमात काही शिकवत होते. याचवेळी एका लहान मुलाने त्यांना ‘मी तुम्हाला मिठी मारू शकतो का?’ असा प्रश्न केला.

हे सुद्धा वाचा

त्या लहान मुलाची ती मागणी पूर्ण करण्यासाठी दलाई लामा यांनी त्याला होकार दिला. तो मुलगा त्यांच्या जवळ आला आणि त्याने दलाई लामा यांना मिठी मारली. त्यांनतर दलाई लामा यांनी त्या मुलास आपल्या गालाचे चुंबन घेण्यास सांगितले. तो मुलगा त्यांच्या गालाचे चुंबन घेतो.

मात्र, यानंतर पुन्हा लामा त्या मुलास आपल्या जिभेला स्पर्श कर असे सांगतात. तो मुलगा त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या जिभेचेही चुंबन घेतो. त्यांनतर लामा त्या मुलास मोठ्याने हसत मिठी मारतात. नेमक्या याच प्रसंगाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. यावरून लोकांनी दलाई लामा यांना ट्रोल केले.

या घटनेमुळे दलाई लामा यांच्यावर खूप टीका झाली. धर्मगुरू दलाई लामा यांनी आपल्यावर झालेल्या टिकेनंतर एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनात त्यांनी माफी मागितली आहे. ‘एक व्हिडिओ क्लिप प्रसारित केली जात आहे. ज्यामध्ये आपण एका मुलाचे चुंबन घेत आहोत असे दाखविले आहे.

त्या मुलाबद्दल आपण आपुलकी व्यक्त करत मुलाचे चुंबन घेतले. मात्र, आपल्या या कृतीमुळे आणि बोलण्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मुलाची, त्याच्या कुटुंबाची आणि मित्रांची आपण माफी मागत आहोत, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.