नवं जोडपं हसत खिदळत होतं, व्हिडीओ शूट करतानाच भयानक घडलं आणि हनीमून ठरला..
गेल्या 1 जून रोजी लोकेश्वर आणि विभूषनीया याचं देवा-ब्राह्मणांच्या साक्षीनं मोठ्या थाटामाटात लग्न झालं होतं..दोघे अत्यंत आनंदात होते.. हनीमूला ते गेले आणि...
बाली : लोकेश्वरण आणि विभूशनीया याचं नुकतंच लग्न झालं होतं आणि दोघे हनीमूनसाठी ( HoneyMoon ) आले होतं. हल्लीचा प्रत्येक क्षण ( Social Media ) समाजमाध्यमावर साजरा करण्याच्या पडलेल्या प्रघातानूसार त्यांनी व्हिडीओ शूट करायचं ठरवलं. आणि जोडप्यानं वाटरबाईकवर रायडींग करायचा मस्त प्लान केला. त्यासाठी खास व्हिडीओ ग्राफर ( Video Shoot ) तैनात होता. स्पीड बोटवर ( Seed Boat ) दोघं आनंदानं चढली आणि नियतीच्या मनात काही वेगळच होतं. सविस्तर वृत्त खालीलप्रमाणे…
गेल्या 1 जून रोजी लोकेश्वर आणि विभूषनीया याचं देवा-ब्राह्मणांच्या साक्षीनं आणि नातेवाईकांच्या गोतावळ्यात तामिळनाडूच्या पुन्नामल्ले या आलिशान मॅरेज हॉलमध्ये मोठ्या थाटा माटाने लग्न झाले होते. हल्लीच्या प्रघाताप्रमाणे हनीमूनला रहाणीमानानूसार परदेशात हे जोडपं गेले होते. परंतू नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
टायटॅनिक स्टाईल पोझ
इंडोनेशियाची राजधानी बाली येथे तामिळनाडूचे लोकेश्वरण आणि विभूषनीया गेले होते. त्यांना स्पीड वॉटर बाईकवर दोघांची टायटॅनिक स्टाईल पोझ घेतलेला व्हिडीओ शूट करायचा होता. परंतू अचानक बोट कलंडली आणि खोल समुद्रात दोघं बुडाले. लोकेश्वरचा मृतदेह शुक्रवारी पाणबुड्यांना सापडला. आणि शनिवारी सकाळी त्याची पत्नी विभूषनीया हीचा मृतदेह सापडला. त्यांच्या कुटुंबियांना ही बातमी कळताच साऱ्याच्या जीवाचं पाणी झालं.
थेट विमान नसल्याने व्हाया मलेशिया मृतदेह..
पोलीसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत या कपलला त्यांचा व्हिडीओ काढायचा होता. परंतू वेगात असलेल्या स्पीड बोटीचा बॅलन्स बिघडून ती अचानक पाण्यात घुसल्याने ती त्यांना घेऊनच समुद्रात गेली. नेमकी काय घडला घडली आहे याचा तपास सविस्तर तपास झाल्यावर कळेल असे म्हटलं जात आहे. भारतीय दूतावासाला या संदर्भात कळविण्यात आल्यानंतर तामिळनाडू सरकारला याबाबत माहीती देण्यात आल्याचे टाईम्सच्या वृत्तात म्हटले आहे. इंडोनेशिया ते चेन्नई थेट फ्लाईट नसल्याने मृतदेहांना मलेशियाला पाठविण्यात आले आहे. तेथून ते तामिळनाडूला मृतदेह विमानाने पाठविण्यात येणार आहेत.