New York Shooting Suspect : ब्रुकलिन सबवे स्टेशनवर गोळीबार करणाऱ्या संशयीताची ओळख पटली; पोलिसांनी केले संशयीताचे फोटो शेअर

New York Shooting Suspect : अमेरिकेच्या न्युयॉर्कमध्यील ब्रुकलिन सबवे स्टेशनवर (New York) 12 एप्रिल रोजी सकाळी बेछूट गोळीबार (Shooting) करण्यात आला होता. या घटनेत जवळपास 20 जण जखमी झाल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली होती. तर अमेरिकेनं मात्र अद्याप तरी या प्रकरणात कोणताही दहशतवादी हल्ल्या झाल्याचं बोललेलं नाही किंवा ते नाकारलं देखील नाही. हा कोणी हल्ला […]

New York Shooting Suspect : ब्रुकलिन सबवे स्टेशनवर गोळीबार करणाऱ्या संशयीताची ओळख पटली; पोलिसांनी केले संशयीताचे फोटो शेअर
ब्रुकलिन सबवे स्टेशनवर गोळीबार करणारा संशयीतImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 12:49 PM

New York Shooting Suspect : अमेरिकेच्या न्युयॉर्कमध्यील ब्रुकलिन सबवे स्टेशनवर (New York) 12 एप्रिल रोजी सकाळी बेछूट गोळीबार (Shooting) करण्यात आला होता. या घटनेत जवळपास 20 जण जखमी झाल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली होती. तर अमेरिकेनं मात्र अद्याप तरी या प्रकरणात कोणताही दहशतवादी हल्ल्या झाल्याचं बोललेलं नाही किंवा ते नाकारलं देखील नाही. हा कोणी हल्ला केला याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नव्हती. मात्र, आता एक फोटो समोर आला असून त्याची चौकशी पोलीस करत आहे. दरम्यान ब्रुकलिन (Brooklyn) सबवे स्टेशनवर गोळीबार करणाऱ्या संशयीताची ओळख पटल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच त्याचे फोटो शेअर करताना न्यूयॉर्क पोलिसांनी (New York Police) त्याचे नाव फ्रँक जेम्स असल्याचे म्हटले आहे. तो संशयीत असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे. त्याचबरोबर फोटो शेअर करताना न्यूयॉर्क पोलिसांनी, नागरिकांना अपीलही केले आहे. ज्यात त्यांनी, आपली एक सुचना आम्हाला मदत करू शकते, असे म्हटले आहे. पोलिसांनी केलेले आवाहन आणि त्यांनी ट्विटर वर शेअर केलेले संशयिताचे फोटो यामुळे नक्कीच त्या संशयीताचा सुगावा लागू शकतो.

नागरिकांवर बेछूट गोळीबार 

न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन येथील स्ट्रीट सबवे स्टेशनवर 12 एप्रिल रोजी सकाळी एका हल्लेखोराने नागरिकांवर बेछूट गोळीबार केला. या दुर्घटनेत अनेकांना गोळ्या लागल्या. तर या घटनेत जवळपास 20 जण जखमी झाल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली होती. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहितीही अग्निशमन विभागाने दिली होती. त्यानंतर आता न्यूयॉर्क पोलिसांनी एका संशयिताची ओळख पटल्याचे सांगत त्याचा फोटो ट्विटर वर शेअर केला आहे. तसेच त्यांनी ट्वीट करत, एक वेळ पहा, हा इसम ब्रुकलिन येथील स्ट्रीट सबवे स्टेशनवर झालेल्या गोळीबारातील संशयीत आहे. सध्या आमचा तपास सुरू आहे. मात्र आपली एक सुचना आम्हाला मदत करू शकते, असे म्हटले आहे. तसेच पोलिसांनी या घटनेला दहशतवादी घटनेशी जोडलेले नाही.

याप्रकरणी रायटर या वृत्तपत्राने पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून सांगितले की, फ्रँक जेम्स याचे वय हे 62 असू शकते. जो विस्कान्सिन किंवा फिलाडेल्फियाचा असू शकतो. याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले होते की, संशयिताने हल्ल्यावेळी गॅस मास्क आणि बांधकामात वापरण्यात येणारे बनियन घातले होते. तर त्याच्या हातात धातूचे एक गोलाकार छोटे पात्र होते. जे त्याने टाकताच त्यातून धूर पसरला आणि लोक पळू लागले. त्यावेळी काही लोक जखमी झाल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.

23 नागरिक जखमी

संशयीताने हल्ला करत 10 नागरिकांवर गोळीबार केला होता. मात्र या घटनेत 13 नागरिक जखमी झाले. यादरम्यान ब्रुकलिन येथील स्ट्रीट सबवे स्टेशनवर पोलिस नव्हते. तसेच पोलिसांचे असे म्हणणे आहे की, त्या एकट्या संशयीतानेच हा हल्ला केला. तर जेव्हा ही घटना घडली तेंव्हा तेथे सकाळचे 8 वाजले असतील. त्यावेळी सबवे स्टेशनवर गर्दी ही होती. यादरम्यान घटनेचा एक व्हिडिओ ही समोर आला आहे. ज्यात नागरिक आरडा ओरडत करत आहेत. सध्या या घटनेचा तपास पोलिस करत आहेत. मात्र अजूनही या घचनेमागचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

इतर बातम्या : 

new york brooklyn shooting : अमेरिकेतील ब्रुकलीन स्टेशनवर हल्ला, संशयास्पद फोटो आला समोर, काय आहे त्या फोटोमध्ये?

New York Firing Brooklyn : न्यूयॉर्कमधील मेट्रो स्टेशनवर गोळीबार, पाच ठार तर अनेक जण जखमी

Pakistan : अखेर शाहबाज शरीफ पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी, देशाचे 23वे पंतप्रधान म्हणून शपथ, मोदींकडून अभिनंदन आणि दहशतवादावरून कानपिचक्या

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.