अंतराळातून थेट घरावर बॅटरीचा तुकडा कोसळला, नागरिकाने NASA वर ठोकली केस, मागितला इतका जबर दंड
भविष्यात अंतराळातील कचरा ही मोठी समस्या होणार आहे. मागे एकदा विमानातून गोठवलेल्या स्वरुपातील मानवी विष्ठेचा दगड कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
तुमच्या आई-वडीलांकडून किंवा वर्तमानपत्रातून तुम्ही सत्तरच्या दशकात अमेरिकेची अवकाश प्रयोगशाळा स्कायलॅब पृथ्वीवर कोसळणार असल्याच्या अफवेची बातमी ऐकली असणार किंवा ऐकली नसेल तर गुगलवर सर्च करुन पाहा. त्यावेळी अनेकांनी पृथ्वी नष्ट होणार म्हणून चांगले चुंगले पदार्थ बनवून खाल्ले होते. काहींनी तर शेवटच्या इच्छा देखील पूर्ण करुन घेतल्या होत्या. अखेर ‘स्कायलॅब’ ला समुद्रात कोसळविण्यात नासाच्या शास्रज्ञांना यश आहे. आता अमेरिकेतील फ्लोरिडा प्रातांतील एक कुटुंबाने अमेरिकेची जगप्रसिद्ध अंतराळ संस्था NASA वर तब्बल 80,000 डॉलरचा ( सुमारे 66 लाख 85 हजार रुपये ) नुकसान भरपाईचा मजबूत दावा ठोकला आहे.
8 मार्च 2021 रोजी अंतराळातून 700 ग्रॅम वजनाचा एक तुकडा या अमेरिकन कुटुंबाच्या छतावर कोसळला आणि त्यामुळे त्यांच्या छताला छीद्र पडले होत. या घटनेनंतर नासाच्या संशोधकांनी या तुकड्याची तपासणी केली असता ती अंतराळात प्रयोगशाळेच्या वापरलेल्या बॅटरीचा तुकडा होता. साल 2021 मध्ये इंटरनॅशलन स्पेस स्टेशनने (ISS ) हा अंतराळात कचरा म्हणून सोडला होता. अमेरिकन स्पेस एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की खरे तर असे तुकडे अंतराळात फिरत असतात. ते फिरत फिरत कधी पृथ्वीच्या वातावरणाच्या कक्षेत शिरले तर जळून आकाशातच नष्ट होतात. परंतू हा बॅटरीचा पार्ट नष्ट झाला नसल्याने नेमका घरावर कोसळला असवा असे स्पष्ट केले.
जीवाचे बरेवाईट झाले असते तर
क्रॅनफिल समनेर ही कायदा फर्म या कुटुंबाची केस लढवित आहे. वकीली मदत पुरविणाऱ्या या संस्थेच्या मते त्यांच्या अशिलाचे फ्लोरिडाच्या नेपल्स येथे एलेजांद्रो ओटेरो यांचे घर आहे. बॅटरीचे नकोसे पार्ट आकाशातून थेट घरावर कोसळ्याने त्यांना काही बरेवाईट झाले असते तर ? घटनेत सुदैवाने त्यांच्या छताला छीद्र पडले आहे. परंतू जीव जाण्याचा देखील धोका होता, म्हणून ही नुकसान भरपाई मागण्यात आल्याने त्यांनी म्हटले आहे.
मुलगा घरी एकटा होता
जेव्हा अंतराळातून ही अवजड वस्तू घरावर कोसळली तेव्हा त्यांचे अशिल ओटेरा यांचा मुलगा डॅनियल घरी एकटा होता. या घटनेत सुदैवाने त्याला काही झाले नाही. परंतू नासाच्या हलगर्जीने एखाद्या व्यक्तीचा जीव देखील जाऊ शकतो असे वकीली फर्मने म्हटले आहे. आपल्या क्लायंटच्या जीवनावर या घटनेने आघात झाला आहे. त्याची नुकसान भरपाई त्यांना मिळायलाच हवी असे वकील मीका गुयेन वर्थी यांनी सांगितले. अंतराळातील कचऱ्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. भविष्यात यामुळे अपघात देखील होऊ शकतात. नासाने यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रीया याबाबती दिलेली दिसत नाही.