सर्कस जगविण्यासाठी अनोखा प्रयत्न, जीवंत प्राण्यांच्या ऐवजी होलोग्रामचा वापर

कान हलवत येणारे मोठे हत्ती, चौखूर उधळणारे घोडे असे एकामागोमाग प्राणी आपल्या समोर दिसतात आणि बच्चे कंपनी टाळ्या पिटते, जीवंत जंगली प्राण्यांच्या वापरा बंदी असल्याने या सर्कशीने थ्रीडी होलोग्रामच्या मदतीने हे प्राणी तयार केले

सर्कस जगविण्यासाठी अनोखा प्रयत्न, जीवंत प्राण्यांच्या ऐवजी होलोग्रामचा वापर
Roncalli1Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Feb 09, 2023 | 2:28 PM

दिल्ली : आपण शेवटची सर्कस कधी पाहीलीय आठवतेय का..जवळपास सगळ्यांनी त्यांच्या बालपणी सर्कस एकदा तरी पाहीली असेल. ही सर्कस आता इतिहास जमा होत चालली आहे. सर्कशीतील प्राण्यांना एनीमल क्रुएलिटी कायद्यांतर्गत बंदी आल्यानंतर सर्कशीला जवळपास टाळेच लागले. या सर्कसीला प्रेक्षक मिळेनासे झाल्याने आपल्या देशातील बहुतांशी सर्कशी बंद झाल्या आहेत. परंतू एका देशाने यावर मात केली आहे, या देशाने सर्कसमध्ये जीवंत प्राण्यांचा वापर करण्याऐवजी आता आधुनिक तंत्राच्या मदतीने होलोग्रामद्वारे प्राणी दाखवण्याचा स्तुत्य उपक्रम सादर केला आहे, त्यास चांगली दाद मिळत आहे.

कान हलवत येणारे मोठे हत्ती, चौखूर उधळणारे घोडे असे एकामागोमाग आपल्या समोर दिसतात. थ्रीडी होलोग्रामच्या मदतीने हे आभासी प्राणी तयार केले आहेत. जर्मनीतील रॉनल्ली सर्कसमध्ये हे 3 – D होलोग्राम प्राणी तयार केले आहेत. या प्राण्यांना पाहून खऱ्या प्राण्यांना पाहील्या प्रमाणेच प्रेक्षकांमधील बच्चे कंपनी खूश होत आहे, टाळ्या वाजत आहे. एनीमल क्रुयल्टी कायदा आल्यानंतर सर्कशीत खऱ्या जंगली प्राण्यांना वापरण्यास कायद्याने मनाई करण्यात आली आहे.

Rheinische रायनश या जर्मन वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानूसार रोनकल्ली सर्कशीची स्थापना 1976 मध्ये झाली होती. 1990 च्या दशकात त्यांनी नविन प्राणी न घेता एक- एक प्राणी कमी करण्याचे धोरण राबविले. त्यानंतर 2018 पर्यंत त्यांनी सर्व जीवंत प्राण्यांचा सर्कशीतला वापर थांबवला आहे. त्यानंतर त्यांनी आधुनिक तंत्राच्या मदतीने हे प्राणी तयार करीत सर्कशीत त्यांच्या थ्रीडी होलोग्राम तंत्राने वापर सुरू केला.

मनोरंजनाची इतर स्वस्त माध्यमे वाढल्याने प्रेक्षकांनी सर्कशीला पाठ फिरविली आहे. चित्रपट, मोबाईल गेम्स आदीमुळे तरूणांनी सर्कसीकडे संपूर्णपणे कानाडोळा केला आहे. प्राणी अत्याचार प्रतिबंधक कायद्यामुळेही सर्कस अडचणीत आली आहे.अमेरीकेतील पिपल्स फॉर दि एथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल अर्था पेटा या संघटनेच्या कार्यकर्त्यानी रिंगलिंग ब्रदर्स आणि त्यानंतर रिंगलिंग ब्रदर्सनी सर्कसीत हत्तींचा वापर बंद केला. प्रेक्षकांना हत्ती दिसायचा बंद झाल्याने तिकीट सेलवर खूपच परीणाम झाला. नंतर प्राणी मित्र संघटनानी सर्कशीतील सिंह, वाघ, घोडे, कांगारू आणि इतर प्राण्यांच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी केली. त्यानंतर 2017 मध्ये 146 वर्षांचा त्यांचा सर्कशीचा धंदा बंद करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

बर्नम बेली सर्कस कॅंपेन विरोधात प्राणी मित्र संघटनांनी  2015 मध्ये लॉ सूट फाईल केला, प्रेक्षकांना पुन्हा सर्कशीकडे खेचण्यासाठी प्राण्यांच्या कसरतीची गरज असते. परंतू या प्राण्यांना शिकवणे आणि पोसणे आवाक्याच्या बाहेरचे काम झाले आहे. 2016 मध्ये जेव्हा जर्मनीतील रॉनकल्ली सर्कस जीवंत प्राण्यांचा वापर करीत होती, त्यावेळी सर्कसच्या एका ट्रीपचा खर्च 90000 डॉलर होता.

सध्या अमेरीकेच्या सात राज्य आणि 149 शहरांमध्ये सर्कशीत जंगली प्राण्यांच्या वापरावर बंदी असल्याचे प्राणी कल्याण संघटना फोर पॉज् यांनी म्हटले आहे. गेल्या वर्षीच न्यूजर्सी आणि हवाई बेटांसह 40 देशांमध्ये सर्कशीत प्राण्यांचा वापर करणाऱ्यावर संपूर्ण बंदी आहे. त्यामुळे रोनकल्ली सर्कस प्रशासनाने जंगली प्राण्यांच्या वापरावर आलेल्या निर्बंधापुढे हार मानता नव्या टेक्नॉलॉजीचा वापर करीत या प्राण्यांना थ्रीडी होलोग्राम तंत्राच्या मदतीने पुन्हा सर्कशीतल्या तंबूंमध्ये आणले असून ‘शो मस्ट गो ऑन’ म्हटले आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.