सौदी सेनेने घेतले शेकडो गरिबांचे प्राण?, श्रीमंत राज्याची कहाणी

१८ वर्षीय मुलीचा सौदी सेनेशी सामना झाला. ती पकडली गेली. एका गोळीने तिचे बोट कापण्यात आले. तो थरारक प्रसंग सांगताना ती थरारते.

सौदी सेनेने घेतले शेकडो गरिबांचे प्राण?, श्रीमंत राज्याची कहाणी
Follow us
| Updated on: Aug 21, 2023 | 8:49 PM

सौदी अरबची सेना गरिबांवर गोळीबार करत आहे. गेल्या दीड वर्षांत सौदी सेनेने शेकडो लोकांना ठार केले. गरिबीमुळे लोकं इथोपीयामधून सौदी अरबमध्ये शरण जात आहेत. ह्युमन राईट्स वॉचच्या रिपोर्टनुसार, यमन सीमेवरून सौदीमध्ये शिरणाऱ्या लोकांवर गोळीबार केला जात आहे. सौदी सरकारने मात्र हा आरोप फेटाळला आहे. ह्युमन राईट वॉचनुसार, सौदी सेना शरणार्थींवर हत्यारांनी हल्ला करत आहे. अशाप्रकारचे आरोप लावण्याची ही काही पहिली वेळ नाही. सौदी सरकारने हे आरोप फेटाळले आहेत. रिपोर्टमध्ये प्रवाशी आणि शरणार्थींचे व्हिडीओ, फोटो दाखवण्यात आले आहेत. यात सौदी सेना किती खतरनाक आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रवाशांनी रात्रीच्या वेळी सीमेच्या उल्लंघनाबाबत चर्चा केली. त्यावरून माहीत झाले की, महिला आणि मुलांनाही सोडले जात नाही. काही लोकांनी सांगितले की, सेनेने त्यांच्यावर गोळीबार केला. तसेच हल्ला करताना शस्त्रांचा वापर करण्यात आला.

सौदीला जाण्यासाठी खर्च केले अडीच हजार डॉलर, सेनेने मारली गोळी

२१ वर्षीय मुस्तफा सौफिया मोहम्मद यांनी सांगितले की, गोळीबार सतत सुरू असतो. ते म्हणाले, आम्ही ४५ लोकं होतो. इथोपीयाची राजधानी जहरावरून सौदी अरबला जाण्यासाठी एका १८ वर्षीय मुलीने अडीच हजार डॉलर खर्च केले. सीमा पार करण्यासाठी तस्कर मोठ्या प्रमाणात पैसे घेतात. १८ वर्षीय मुलीचा सौदी सेनेशी सामना झाला. ती पकडली गेली. एका गोळीने तिचे बोट कापण्यात आले. तो थरारक प्रसंग सांगताना ती थरारते.

युनायटेट नेशनच्या रिपोर्टनुसार, दरवर्षी दोन लाख लोकं अवैध पद्धतीने सीमा पार करण्याचा प्रयत्न करतात. ऑफ्रिकेकडून समुद्राच्या मार्गे सौदीत प्रवेश करतात. तस्कर अशावेळी मारपीट करतात. समुद्र पार करणे कठीण काम आहे. नुकतेच एक जहाज डुबल्यामुळे २४ प्रवासी मारले गेले. यमनच्या मार्गाने येणारे लोकं हे श्मशानातून जातात. सेनेच्या गोळीबारानंतर गरिबांचे मृतदेह तसेच पडून राहतात.

गरीब लोकं करतात सौदीला जाण्याचा प्रयत्न

मार्च २०२२ ते जून २०२३ पर्यंतच्या आकड्यांनुसार, २८ प्रकरणांचा खुलासा झाला आहे. यात गोळीबार आणि शस्त्रांचा वापर केला गेला होता. १४ प्रकरणांमध्ये सेनेने प्रवाशांना अटक केली. त्यानंतर गोळीबार केला. इथोपिया अरब प्रदेशातील गरीब देश आहे. गरिबीमुळे ते दुसऱ्या भागात जातात. पैसे खर्च केल्यास प्रवास वैध मानला जातो. पण, गरीब लोकं लपूनछपून सौदीला जाण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी ते सेनेच्या गोळीबाराचे बळी ठरतात.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.