Israel Hamas War | मोठी अपडेट, इस्त्राईल-हमास युद्धात तालिबान पण मैदानात,आली पहिली प्रतिक्रिया

Israel Hamas War | तालिबानच्या भीतीने अफगाणी नागरिकांनी कसं पलायन केलं. विमानाला लटकून जाण्याची तयारी नागरिकांनी केली, हे चित्र उभ्या जगाने पाहिले. तालिबानने अफगाणिस्तानात जे केले, त्यावरुन त्यांचे कट्टरतावादी विचार समोर आले आहे. आता इस्त्राईल-हमास युद्धावर त्यांनी हे मत मांडले आहे.

Israel Hamas War | मोठी अपडेट, इस्त्राईल-हमास युद्धात तालिबान पण मैदानात,आली पहिली प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Oct 11, 2023 | 4:47 PM

नवी दिल्ली | 11 ऑक्टोबर 2023 : अमेरिका आणि तालिबानमधील करारानुसार, शेवटचा सैनिक बाहेर पडल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानवर (Afghanistan Taliban) कब्जा मिळवला. त्यानंतर या देशातून आलेल्या बातम्यांनी उभ्या जगाला तिथल्या महिलांची, मुलांची चिंता लागली. कारण या राजवटीत महिलांना गौण स्थान असल्याचे तालिबानने कृतीतून जाहीर केले. त्यांच्या कायद्यांनी अल्पसंख्याक समाजाचे जगणे मुश्किल झाले. त्यातील काहींनी देश सोडला. जे काही उरले आहेत, ते जीव मुठीत घेऊन हालाकीचं जीवन कंठत आहेत. तालिबानने यापूर्वी दाखवलेला क्रुरपणा उभ्या जगाने पाहिला आहे. पण तोच तालिबान इस्त्राईल-हमास (Israel-Hamas War) युद्धावर काय म्हणतोय, ते तर वाचा..

वाचा तालिबानचा सल्ला

इस्त्राईल-हमास युद्धात तालिबानने कोणत्या पक्षाला पाठिंबा दिला नाही. इस्त्राईल आणि हमास यांनी या संघर्षात शांततेचा मार्ग निवडावा असा सल्ला तालिबानने दिला आहे. त्यांनी युद्धापासून, संघर्षापासून दूर राहण्याचे दोघांना आवाहन केले आहे. अमेरिका, इंग्लंडसह इतर देश इस्त्राईलच्या बाजूने तर काही मुस्लीम राष्ट्रे हमासच्या बाजूने झुकली आहे. पण तालिबानने अधिकृतपणे कोणालाच पाठिंबा दिला नाही.

हे सुद्धा वाचा

तालिबान सैनिकांचा सहभाग नाही

काही मीडिया रिपोर्टमध्ये तालिबान त्यांचे सैनिक गाझा पट्टीत घुसवेल असा दावा करण्यात येत होता. हे सैनिक इस्त्राईलविरोधात हमासला मदत करणार असल्याचे वृत्त समोर आले होते. पण तालिबानने या वृत्ताचे खंडन केले आहे. त्याची अशी कोणतीही योजना नसल्याचे तालिबानने स्पष्ट केले आहे. अफगाणिस्तानच्या जमिनीचा वापर कोणत्याही दहशतवादी कारवायांसाठी करु देणार नसल्याचे तालिबानने पुन्हा एकदा म्हटलं आहे.

आम्ही घडवतोय अफगाणिस्तान

नावं ठेवणाऱ्या जगाला कृतीतून उत्तर देणार असल्याचे तालिबानने स्पष्ट केले. अफगाणिस्तान नव्याने उभा करण्यावर आमचे लक्ष केंद्रित आहे. त्यामुळे इतर कोणत्याही वादात सध्या आम्ही पडणार नाही. कोणताही चुकीचा निर्णय घेणार नसल्याचे तालिबानने स्पष्ट केले आहे. तालिबानच्या परराष्ट्र मंत्रालयाने, गाझातील घडामोडींवर आमचे बारीक लक्ष असल्याचे नमूद केले. पण तालिबानने शांततेचा नारा दिल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.