VIDEO : उद्धवजी, माझ्या-आई वडिलांना वाचवा, पुण्यातील अफगाणी विद्यार्थ्याची आर्त हाक!

तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तिकडे अफरातफरी माजली आहे. राष्ट्रपतींनी देश सोडल्यानंतर सामान्य नागरिकही दहशतीने देश सोडून जात आहेत. तिथले नागरिक विमानाच्या पंख्यावर बसून जीव वाचवण्यासाठी जीवघेणी धडपड करताना दिसत आहेत.

VIDEO : उद्धवजी,  माझ्या-आई  वडिलांना वाचवा, पुण्यातील अफगाणी विद्यार्थ्याची आर्त हाक!
Mohammed Ahmadi_Uddhav Thakeray
Follow us
| Updated on: Aug 17, 2021 | 12:04 PM

पुणे : तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तिकडे अफरातफरी माजली आहे. राष्ट्रपतींनी देश सोडल्यानंतर सामान्य नागरिकही दहशतीने देश सोडून जात आहेत. तिथले नागरिक विमानाच्या पंख्यावर बसून जीव वाचवण्यासाठी जीवघेणी धडपड करताना दिसत आहेत. त्यातच आपल्या नातेवाईकांच्या चिंतेने जगभरातील अफगाण नागरिक अस्वस्थ आहेत. इकडे पुण्यातही काही अफगाणिस्तानातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मोहम्मद अहमदी हा मूळचा अफगाणिस्तानचा विद्यार्थी सध्या पुण्यात राहतो. त्याचे आई-वडील अफगाणिस्तानातील काबूल शहरात अडकले आहेत. आपल्या आई-वडिलांच्या सुटकेसाठी त्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनवणी केली आहे.

माझे आई-वडील अफगाणिस्तानच्या काबूल शहरात अडकले आहेत. तिकडची परिस्थिती खूप खराब आहे. दोन दिवसांपूर्वी माझं 5 मिनिटं आई वडिलांशी बोलणं झालं होतं,ते सध्या सुरक्षित आहेत. मी आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार असून, महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारने मला मदत करावी, अशी विनवणी मोहम्मद अहमदीने केली. तो टीव्ही 9 मराठीशी बोलत होता.

दोन्ही सरकारने प्रयत्न करावे

माझ्या आई वडिलांची सुटका व्हावी त्यासाठी दोन्ही सरकारने प्रयत्न करावेत. उद्धव ठाकरेंना विनंती आहे की व्हिसाची प्रक्रिया सोपी करावी, ज्यामुळे आम्हाला भारतात येता येईल, असं मोहम्मद अहमदी म्हणाला.

दहा वर्षापासून पुण्यात

मी 10 वर्षांपासून पुण्यात राहत आहे, शिक्षणासाठी मी पुण्यात आलो होतो. मी अफगाणिस्तानमध्ये गेलो तर माझ्या जीवाला धोका आहे, त्यामुळे मी तिकडे जात नाही, असंही मोहम्मद अहमदी म्हणाला.

VIDEO :

संबंधित बातम्या 

तालिबानने 25 वर्षांपूर्वीही अफगाणिस्तान केले होते काबीज, तत्कालीन राष्ट्रपतींना लटकवले होते भर चौकात  

अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतीनं देश सोडताना काय काय सोबत नेलं? पैसा, गाड्यांबाबत पहिल्यांदाच रिपोर्ट

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.